1 / 7ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलन... निसर्गाच्या प्रकोपाचा हिमाचल प्रदेशला तडाखा बसला. मंगळवारी एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी झाली. नद्या-नाल्यांना पूर आले आणि अनेक ठिकाणी घरेही वाहून गेली.2 / 7पाऊस आणि पुरामुळे वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असून, त्यात ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.3 / 7फक्त मंडी जिल्ह्यातच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. १०३ लोक जखमी झाले आहेत. मंडी जिल्ह्यात ७ ठिकाणी ढगफुटी होऊन पूर परिस्थिती ओढवली. अचानक पूर आल्याने, त्याचबरोबर ढगफुटी झाल्याने काही गावांचा संपर्क तुटला.4 / 7राज्य आपतकालीन मोहीम केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ५१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूर, पाण्यात बुडून, भूस्खलन आणि वीज पडून अशा घटनांमध्ये हे बळी गेले आहेत.5 / 7सध्या २२ लोक बेपत्ता आहेत. सर्वाधिक मृत्यू मंडी जिल्ह्यात झाले आहेत. तर तिथे ३४ लोक बेपत्ता आहे. अचानक पूर, ढगफुटी या कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.6 / 7राज्यात अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. असंख्य घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून,२८३ कोटींच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे.7 / 7२८२ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सध्या शोध आणि मदत कार्य वेगात सुरू असून, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांचीही मदत घेतली जात आहे.