1 / 5पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केली. या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यआ एअर स्ट्राईकमुळे वरील तिन्ही दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांचं जबर नुकसान झालं आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या स्ट्राईकमुळे या दहशतवादी संघटनांचं कंबरडं कसं मोडलं आहे याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे. 2 / 5२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याचे तीन प्रमुख अड्डे होते. त्यामध्ये मुरिदके, सवाई नल्ला आणि मरकज अहले हदीस यांचा समावेश आहे. भारतीय हवाई दलाने या तीनही अड्ड्यांना पूर्णपणे नष्ट केलं आहे. मुदरिदके कॅम्प, हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ ३० किमी अंतरावर होता. तर बरनाला आणि नल्ला येथून हत्यारे, ड्रोन आणि आयईडीचं प्रशिक्षण दिलं जात असे. येथील हल्ल्यामुळे हाफिज सईद याचं नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. त्याच्याकडे नव्या दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि भारतविरोधी कारवायाकरण्याची योजना तराय करण्यासाठीचा असलेला आधार सध्यातरी संपुष्टात आला आहे.3 / 5जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या मसूद अझहर याचंही कंबरडं भारतीय सैन्यदलाने या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून मोडलं आहे. जैश ए मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयासह बिलाल कॅम्प आणि कोटली येथील लॉन्चपॅडला लक्ष्य करून नष्ट करण्यात आलं. बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचा मुख्य अड्डा हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून तब्बल १०० किमी दूर अंतरावर होता. तो आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. एवढंच नाही तर या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहरचे १० नातेवाईकही मारले गेले आहेत. दरम्यान, या एअरस्ट्राईकमुळे मसूद अझहरची नव्या दहशतवाद्यांची भरती आणि आत्मघाती हल्ले करण्याची क्षमता सद्यस्थितीत ठप्प झाली आहे. 4 / 5भारतीय सैन्य दलांनी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन यालाही जबर दणका देण्यात आला आहे. त्याच्या कोटली, मेहमुना जोया (सियालकोट) आणि राहील शाहिद कॅम्पसारख्या अड्ड्यांना उदध्वस्त करण्यात आले. हिज्बुलचे बहुतांश अड्डे हे एलओसीपासून १० ते १५ किमी अंतरावर होते. त्यामुळे सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीला काही काळ आळा बसण्याची शक्यता आहे. कालच्या एअरस्ट्राईकमुळे सय्यद सलाउद्दीनकडेही घुसखोरी करण्यासाठी सुरक्षित रस्ते आणि प्रशिक्षणासाठी कॅम्प उरलेले नाहीत. 5 / 5ऑपरेशन सिंदूर ही भारताने आतापर्यंत केलेली सर्वात अचूक आणि रणनीतिकदृष्ट्या प्रबळ अशी एअरस्ट्राईक मानली जात आहे. हे केवळ लष्करी यश नाही तर मुत्सद्देगिरीमधीलही जबरदस्त यश मानलं जात आहे. या माध्यमातून भारताने आपण सीमेपलीकडे लपलेल्या शत्रूंनाही घरात घूसून धडा शिकवू शकतो, हे दाखवून दिले आहे. एकूणच या एअर स्ट्राईकमुळे मसूद अझहर हाफिझ सईद आणि सय्यद सलाउद्दीन यांच्यासारख्या दहशतवाद्यांना जबर झटका बसला आहे.