शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सात वर्षाच्या मुलासह वन कर्मचाऱ्याची शिकार; रणथंबोरची कनकटी वाघीण 'नजरकैदेत' राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 22:13 IST

1 / 5
सवाई माधोपूरमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीने एका महिन्यात दोन जणांची शिकार केली. यात एका सात वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. तर दुसरा व्यक्ती वनविभागातील रेंजर देवेंद्र चौधरी आहे.
2 / 5
रणथंबोरमधील वाघीण कनकटी ऊर्फ अन्वीने कार्तिक सुमन या मुलाची शिकार केली. व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडून ही वाघीण कुतलपुरा गावातील एका शेताममध्ये आली होती. लोकांनी घरावर चढून आपला जीव वाचवला.
3 / 5
गावात वाघीण शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वनविभागाला याबद्दल कळवले. वाघिणीला बेशुद्ध करताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. वाघिणी एका हॉटेलमध्ये शिरली होती. बऱ्याच धावपळीनंतर तिला बेशुद्ध करून पकडण्यात आले.
4 / 5
कनकटी वाघिणीला आता एनक्लोजरमध्ये नेऊन सोडण्यात आले आहे. हा परिसरात मर्यादित असतो आणि जिथे त्यांच्यावर नजर ठेवली जाते. आता कनकटी वाघिणीला इथे किती वर्ष ठेवले जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
5 / 5
कनकटी वाघिणीला भिड नाका येथे तयार केलेल्या एनक्लोजरमध्ये सोडण्यात आले. पण, तिला पुढील किती वर्षे इथे राहावे लागणार, हे आता एनटीसीए ठरवणार आहे. तिला कैदेत राहावं लागणार की पुन्हा व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार, याचा निर्णय पुढील काही दिवसात होईल.
टॅग्स :Tigerवाघforestजंगलforest departmentवनविभाग