शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Flashback 2015 - जुलै ते सप्टेंबर

By admin | Published: December 22, 2015 12:00 AM

1 / 11
संपूर्ण भारताला हादरवणारे दादरी हत्याकांड २८ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशात घडले. या घटनेनंतर असहिष्णूतेचा मुद्दा ऐरणीवर आला आणि पुरस्कार वापसीला चालना मिळाली. बीफ बाळगल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाखची जमावाने हत्या केली होती.
2 / 11
२८ सप्टेंबर रोजी भारताने अॅस्ट्रोसॅट ही अवकाशातील पहिली संशोधन कार्यशाळा दाखल केली.
3 / 11
नेपाळच्या राज्यघटनेबद्दल असंतोष असलेल्या मधेशी व थारू या वांशिक गटांनी भारतातून नेपाळमध्ये जाणारी मालवाहतूक २५ सप्टेंबर रोजी अडवून धरली. स्वयंपाकाचा गॅस पेट्रोल अशाप्रकारच्या सर्व जीवनावश्यक गोष्टींची अभूतपूर्व टंचाई नेपाळमध्ये निर्माण झाली.
4 / 11
गुजरातमधल्या भाजपा सरकारला मूळापासून हलवणा-या हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली पटेल समाजाची आरक्षणासाठी निदर्शने २६ ऑगस्ट रोजी सुरू झाली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ८ जणांना जीव गमवावा लागला. गुजरातमधल्या काही शहरांमध्ये लष्कर पाचारण करण्यात आले.
5 / 11
जीवनाचा त्याग करणारी जैन धर्मीयांची संथारा ही प्रथा बेकायदेशीर असल्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी दिला. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला ३१ ऑगस्ट रोजी स्थगिती देत हजारो वर्षांच्या या परंपरेला दिलासा दिला आहे.
6 / 11
जम्मू श्रीनगर महामार्गावरील लष्करी ताफ्यावर हल्ला करणा-या दहशतवाद्याला ६ ऑगस्ट रोजी स्थानिक नागरिकांच्या मदतीने लष्करी जवानांनी जिवंत पकडले. मोहम्मद नावेद नावाचा हा तरूण पाकिस्तानातल्या फैसलाबादचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
7 / 11
नागालँडच्या समस्येवर अखेर सन्मानजन्य तोडगा निघण्याची शक्यता ३ ऑगस्ट रोजी निर्माण झाली. केंद्र सरकार व NSCN (IM) यांच्यात करार झाला व १६ वर्षे सुरू असलेली बोलणी यशस्वी झाली.
8 / 11
२७ जुलै रोजी पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या दहशतवाद्यांनी पंजाबमधल्या गुरुदासपूर येथील पोलीस ठाण्यावर आत्मघातकी हल्ला चढवला. यामध्ये तीन दहशतवाद्यांसह ९ जण ठार झाले.
9 / 11
इस्त्रोने १० जुलै रोजी इंग्लंडच्या पाच उपग्रहांचे प्रक्षेपण केले आणि नवा इतिहास घडवला.
10 / 11
गृहखात्याने ९ जुलै रोजी नागालँड हा अस्वस्थ प्रदेश असल्याचे घोषित केले आणि आफस्पा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट १९५८) एका वर्षासाठी लागू केला.
11 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ जुलै रोजी डिजिटल इंडिया या कार्यक्रमाच्या अमलबजावणीची घोषणा केली. सर्वसामान्य भारतीयांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोयीसुविधा पुरवण्याचे जाहीर करण्यात आले.