शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर बांधले फाइव्ह स्टार हॉटेल, अत्याधुनिक सुविधांसह अशी आहेत खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 8:23 PM

1 / 8
गुजरातमधील गांधीनगर येथे एक असे रेल्वेस्टेशन बांधण्यात आले आहे ज्याच्या खास वैशिष्ट्यांबाबत जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असे रेल्वेस्टेशन देशामध्ये अन्य कुठे उभारण्यात आलेले नाही. या रेल्वे स्टेशनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. येथे स्वतंत्र प्रार्थना भवन तसेच बेबी फिडिंग रूम आहेत.
2 / 8
आधुनिक सुविधांसोबत प्राथमिक उपचारांसाठी एक छोटेशे रुग्णालय बनवण्यात आले आहे. सर्वात खास बाब म्हणजे येथील हे रेल्वे स्टेशन फाइव्ह स्टार हॉटेलच्या खाली बांधण्यात आले आहे.
3 / 8
स्टेशनच्या आत असलेल्या एका गेटमधून प्रवासी ट्रेनमधून उतरून थेट हॉटेलमध्ये जाऊ शकतात. या फाइव्ह स्टार बिल्डिंगच्या खाली मुख्य प्रवेशद्वारावर तिकीट खिडकीजवळच लिफ्ट आणि एस्कलेटर लावण्यात आला आहे. त्या माध्यमातून लोकांना प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचणे सोईचे ठरते.
4 / 8
स्टेशन परिसरात बांधण्यात आलेल्या नव्या बिल्डिंगमध्ये एंट्री गेट, बुकिंग, लिफ्ट एस्कलेटर, बुक स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल यांच्यासह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तर येथील भिंतींवर गुजरातच्या वेगवेगळ्या मोन्युमेंटचे फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वेस्टेशनच्या आत अयोध्येतील राम मंदिराचा लावण्यात आलेला फोटो प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो.
5 / 8
रेल्वेस्टेशनच्या वरच्या भागात ३०० रूम असलेले फाईव्ह स्टार हॉटेल आहे. हे हॉटेल लीला ग्रुपच्या माध्यमातून चालवले जाईल. गांधीनगरच्या रेल्वे स्टेशनवर उभारण्यात आलेल्या या फाइव्ह स्टार हॉटेलचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे हॉटेल गांधीनगरमधील सर्वात उंच बिल्डिंग आहे.
6 / 8
या बिल्डिंगवरून लोक संपूर्ण गांधीनगर, महात्मा मंदिर आणि विधानसभेला एका ओळीत पाहू शकतात. तसेच येथून महात्मा मंदिर आणि दांडी कुटीरही जवळ आहे.
7 / 8
भारतीय रेल्वेला एक नवी ओळख देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनची सुरुवात गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्टेशनमधून झाली आहे.
8 / 8
या रेल्वे स्टेशनवर बांधण्यात आलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलमुळे लोकांना फायदा होणार आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलसाठी फार शोध घ्यावा लागणार नाही.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेtourismपर्यटनGujaratगुजरात