शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Encounter in Nagrota: ३ तास सुरु होता गोळीबार! काळ बनून समोर आले जवान, ११ एके ४७ हातात असून देखील कापत होते दहशतवादी 

By पूनम अपराज | Published: November 19, 2020 9:42 PM

1 / 5
नगरोटा चकमकीत 4 दहशतवादी ठार : जम्मूच्या नगरोटा येथील टोल प्लाझा येथे तपासणी दरम्यान सुरक्षा दलांनी एन -44 येथे चार दहशतवाद्यांना घेरले. असे म्हटले जात आहे की, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असू शकतात. (All Photo - NBT)
2 / 5
जम्मूमधील टोल प्लाझा येथे एन्काऊंटर, सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला : दहशतवाद्यांकडून 11 एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, दारुगोळा देखील मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. 3 डझन ग्रेनेड व 6 पिस्तूलही सापडल्या. बन प्लाझा येथे तपासणी दरम्यान दहशतवाद्यांनी घेरले. त्यानंतर गोळीबार सुरू केला.
3 / 5
ट्रकच्या तपासादरम्यान गोळीबार, ४ तास चकमक सुरु - माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी म्हणाले की, गुप्तचरांच्या आधारे हे तपासणी कार्यवाही सुरू आहे. ट्रकची झडती घेतली असता गोळीबार सुरू झाला. एन्काउंटर 3 तास सुरु होता. ही कारवाई स्थानिक पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या पथकाने केली.
4 / 5
ट्रकमधील पोत्यांमध्ये लपलेले दहशत - संशयित ट्रक पहाटे पाच वाजता प्लाझा येथे आला. हे दहशतवादी ट्रकमध्येच पोत्यात लपून बसले होते. तेथून त्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने ट्रकलाच उडवले. त्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलाकडे पळाले.
5 / 5
जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी यांनी माहिती दिली, वैष्णो देवी कटरा कॅम्प ची सुरक्षा व्यवस्था वाढली -  या चकमकीनंतर उधमपूर जिल्ह्यातही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय माता वैष्णो देवी मंदिराच्या कटरा बेस कॅम्पमध्येही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.