शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:43 IST

1 / 10
दिल्लीत अंमलबजावणी संचालनालयाने(ED) एका मोठ्या कारवाईत कोट्यवधीची रोकड, सोने, हिऱ्याचे दागिने आणि बेनामी संपत्तीचे कागदपत्रे जप्त केली आहेत. कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी इंद्रजित सिंग यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध ३० डिसेंबर रोजी टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने 'काळा खजिना' जप्त केला आहे.
2 / 10
दिल्लीतील सर्वप्रिय विहार येथे ईडीच्या पथकाने इंद्रजितचा सहकारी अमन कुमारच्या घरी छापा टाकला. त्यावेळी सोन्याचे दागिने आणि कोट्यवधी रोकड पाहून अधिकारी हैराण झाले. ईडीने एकूण ५.१२ कोटींची रोकड जप्त केली. त्याशिवाय सोने आणि हिऱ्याने भरलेली बॅगही ईडीच्या हाती लागली आहे.
3 / 10
या सोने हिऱ्याच्या दागिन्याची किंमत जवळपास ८.८० कोटी असल्याचे बोलले जाते. एक बॅग भरून चेक बुक आणि ३५ कोटी संपत्तीचे कागदपत्रेही जप्त करण्यात आले आहेत. सध्या ईडीकडून ही छापेमारी अजूनही सुरू आहे त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे.
4 / 10
ईडीने इंद्रजित सिंग यादव, त्याचे सहकारी आणि अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड नावाच्या कंपनीविरुद्ध पीएमएलए गुन्हा दाखल केला आहे. यादववर खंडणी, खाजगी गुंतवणूकदारांकडून जबरदस्तीने कर्ज वसूल करणे, सशस्त्र धमकी देणे आणि या बेकायदेशीर कामांमधून कमिशन मिळवणे असे आरोप आहेत.
5 / 10
हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी त्याच्याविरुद्ध सुमारे १५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या एफआयआरच्या आधारे ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली आहे.
6 / 10
ईडीने दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित सिंगचा सहकारी अमन कुमार याच्या सर्वप्रिय विहार येथील घरातून आतापर्यंत ५.१२ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम इतकी जास्त होती की बँकेच्या अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याच्या मशिनसह बोलावण्यात आले होते.
7 / 10
एक सुटकेस सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनी भरलेली ईडीच्या तपास अधिकाऱ्यांना आढळली. यात ८.८० कोटींचे दागिने असल्याचे बोलले जाते. त्याशिवाय अंदाजे ३५ कोटी रुपयांच्या चेकबुक आणि मालमत्तेची कागदपत्रे देखील ईडीकडून तपासली जात आहेत.
8 / 10
संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये लपून बसलेल्या गुन्हेगार इंद्रजीत सिंग यादव आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. २६आणि २७ डिसेंबर रोजी दिल्ली, गुरुग्राम आणि रोहतकमधील १० ठिकाणी छापे टाकून ईडीने पाच आलिशान कार, बँक लॉकर, १.७ दशलक्ष रुपये रोख, अनेक गुन्हेगारी कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि डेटा जप्त केला होते.
9 / 10
इंद्रजित सिंग यादव याने एक वेबसाइट बनवली होती. ज्यातून तो कॉर्पोरेट हाऊस आणि खाजगी गुंतवणूकदार यांच्यात कर्जाचे समझोते करत होता. हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या १५ हून अधिक एफआयआरच्या आधारे इंद्रजितवर खून, खंडणी, कर्ज परतफेड, फसवणूक, बेकायदेशीर जमीन हडप आणि हिंसक गुन्ह्यांचे आरोप आहेत.
10 / 10
तपासात असे दिसून आले की, अपोलो ग्रीन एनर्जीसारख्या काही कॉर्पोरेट हाऊसने झज्जरमधील दिघल गावातील एका खाजगी फायनान्सरकडून कोट्यवधी रुपये रोख कर्ज घेतले आणि सिक्युरिटी म्हणून पोस्ट-डेटेड चेक दिले. इंद्रजितने सशस्त्र सहकारी आणि टोळ्यांच्या मदतीने धमक्या देऊन या कर्जांची परतफेड करण्यास भाग पाडले आणि कमिशनच्या स्वरूपात शेकडो कोटी रुपये मिळवले. परदेशी संघटित गुन्हेगारी सिंडिकेट्स देखील यात सामील होते.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMONEYपैसा