शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:54 IST

1 / 8
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींबाबत विचारलं असता तुम्ही काही नावं सहज सांगू शकता. तसेच सर्वात श्रीमंत खेळाडू, अभिनेता यांच्याबाबतही तुम्हाला माहिती असेल. मात्र देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टर कोण? असं विचारलं असता तुम्हाला त्याचं उत्तर पटकन देता येणार नाही. तर आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टरबाबत माहिती देणार आहोत.
2 / 8
तर डॉक्टर शमशीर वायलिल हे भारतामधील सर्वात श्रीमंत डॉक्टर आहेत. डॉक्टर शमशीर यांनी केरळमधील एका छोट्याशा शहरामधून सुरुवात करून आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. आज त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत डॉक्टरांमध्ये होते. तसेच डॉ. शमशीर वायलिल यांनी मध्य-पूर्वेमध्ये बर्जिल होल्डिंग्सची स्थापना केली. हा आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठा समुहा आहे. तसेच त्यांची संपत्ती ३.७ दशलक्ष डॉलर (३० हजार ७७० कोटी रुपये) एवढी आहे. डॉ. वायलिल हे भारतातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ५७ व्या क्रमांकावर आहेत.
3 / 8
१९७७ साली केरळमधील कोझिकोड येथे एका व्यावसायिक कुटुंबाच जन्मलेल्या डॉ. शमशीर यांनी मणिपालच्या कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील श्री रामचंद्र वैद्यकीय महाविद्यालयामधून रेडियोलॉजीमध्ये एमडीची पदवी घेतली.
4 / 8
सन २००४ मध्ये डॉ. वायलिल यांनी अबुधाबी येथील शेख खलिफा मेडिकल सिटीमध्ये रेडियोलॉजिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नोकरी करत असतानाच हेल्थकेअर क्षेत्रात काही तरी मोठं करून दाखवण्याची इच्छा त्यांच्या मनात प्रबळ झाली.
5 / 8
सन २००७ मध्ये त्यांनी त्यांचे सासरे आणि धनाढ्य व्यापारी एम.ए . युसूफ अली यांच्या मदतीने अबूधाबी येथे पहिलं रुग्णालय सुरू केलं. तसेच डॉ. वायलिल यांच्या दूरदृष्टीमधून पुढे बर्जिल होल्डिंग्स आकारास आली.
6 / 8
बर्जिल होल्डिंग्सची आज यूएई आणि ओमानमध्ये सुमारे ३९ रुग्णालये आणि मेडिकल सेंटर आहेत. तसेच त्यांच्याकडे १३ हजारांहून अधिक कर्मचारी वर्ग असून, ते तीन देशांमधील २० रुग्णालयांमधून काम करत आहेत.
7 / 8
डॉ. शमशीर यांनी भारतामधील आरोग्य क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांनी गुंतवणूक केलेल्या रुग्णालयांमध्ये कोची येथील व्हीएचपी लेकशोर रुग्णालय, डायनमेट आणि एज्युकेयर इन्स्टिट्युट ऑफ डेंटल सायन्स यांचा समावेश आहे. तसेच सन २०१६ मध्ये व्हीपीएस हेल्थकेअरच्या माध्यमातून कोची आणि दिल्ली एनसीआरमधील रुग्णालयातील भागीदारी खरेदी केली होती.
8 / 8
एक यशस्वी डॉक्टर असण्यासोबत दानशूरही आहेत. सन २०१८ मध्ये केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला असताना त्यांनी १.७५ कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे दिली होती. तर हल्लीच अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ६ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.
टॅग्स :doctorडॉक्टरMONEYपैसाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय