शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS: बागेश्वर धाममध्ये १५६ मुलींचा विवाह; प्रत्येक नवरदेवाला बाईक, नववधू भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 8:48 PM

1 / 5
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे गरीब कुटुंबातील १५६ मुलींचा सामूहिक विवाहसोहळा पार पडला. बागेश्वर धामचे मठाधीपती धीरेंद्र शास्त्री यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लग्न लागल्यानंतर निरोपाची वेळ आली तेव्हा नववधू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
2 / 5
या भव्य कार्यक्रमाची सुरुवात वधू-वरांच्या स्वागताने झाली. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करून जोडप्यांना मंचावर आणले. मंचावर एकमेकांना पुष्पहार घालण्याचा विधी पार पडला. मंचावर उपस्थित पाहुण्यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले आणि त्यानंतर विधी पार पडले. या सर्व जोडप्यांनी मंडपात सातफेरे घेतले.
3 / 5
खरं तर पाचव्यांदा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन धीरेंद्र शास्त्री यांनी केले. यावेळी सर्व जोडप्यांना १५७ प्रकारच्या घरगुती वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. यामध्ये मोटारसायकलपासून ते रामायण आणि गीतापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. वधू-वरांनी धीरेंद्र शास्त्रींची स्तुती केली.
4 / 5
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये मोटारसायकल देण्याऐवजी जोडप्यांची संख्या वाढवली जाईल, कारण साहित्यावर खर्च झालेल्या रकमेतून अनेक गरीब मुलींचे लग्न पार पडू शकते, त्यामुळे पुढील वर्षी २५१ गरीब मुलींचे लग्न होणार आहे.
5 / 5
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या मोठ्या सामूहिक कन्या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन जोडप्यांना आशीर्वाद दिले. कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेले मोहन यादव यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, मध्य प्रदेश सरकार देखील अशा विवाहसोहळ्यांचे आयोजन करत आहे.
टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न