शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

DGCAची Spicejetवर कारवाई; पुढील 8 आठवड्यांसाठी 50% उड्डाणांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 6:01 PM

1 / 7
गेल्या काही दिवसांपासून स्पाईसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता DGCA ने स्पाईसजेटवर कारवाई केली आहे. पुढील 8 आठवड्यांसाठी स्पाईसजेटच्या 50% फ्लाइट्सवर बंदी घालण्यात आली आहे.
2 / 7
याशिवाय आठ आठवड्यांसाठी कंपनीला अतिरिक्त निगराणीखाली ठेवण्यात येईल. तसेच, कंपनीला भविष्यात 50 टक्क्यांहून अधिक उड्डाणे करायची असतील, तर अतिरिक्त भार उचलण्याची क्षमता, पुरेशी संसाधने आणि कर्मचारी उपलब्ध असल्याचे सिद्ध करावे लागेल.
3 / 7
काही दिवसांपूर्वी डीजीसीएने स्पाइसजेटला नोटीस बजावली होती. स्पाईसजेटच्या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक त्रुटी लक्षात घेता, ही नोटीस पाठवण्यात आली होती. अलीकडेच, सरकारने राज्यसभेत स्पाईसजेटबाबत महत्वाची माहिती दिली होती.
4 / 7
DGCA ने स्पाइसजेटच्या विमानांचे स्पॉट चेकिंग केले आहे, त्या तपासणीत मोठी त्रुटी आढळली नाही. परंतु अहवालात डीजीसीएने निश्चितपणे सांगितले होते की, सध्या सर्व प्रकारच्या तांत्रिक बिघाड दूर झाल्यावरच कंपनीने आपली 10 विमाने वापरावीत.
5 / 7
18 दिवसांत स्पाइसजेटच्या विमानांमध्ये 8 वेळा तांत्रिक बिघाड आढळून आला. या कारणास्तव डीजीसीएने कंपनीला नोटीस पाठवली. त्या नोटीसमध्ये असे म्हटले की, या सततच्या घटनांमधून असे दिसून येते की, खराब अंतर्गत सुरक्षा निरीक्षण आणि अपुऱ्या देखभालीमुळे सुरक्षा मार्जिन कमी झाले आहे.
6 / 7
स्पाइसजेट व्यतिरिक्त इतर विमान कंपन्यांच्या विमानांमध्येही तांत्रिक बिघाड दिसून आला आहे. डीजीसीए कोरोना हे देखील याचे एक कारण मानते, कारण लॉकडाऊनच्या वेळी फ्लाइट्सच्या ऑपरेशनवर बंदी घालण्यात आली होती.
7 / 7
या लॉकडाउन काळात कर्मचाऱ्यांमध्येही मोठी कपात करण्यात आली. कोरोनानंतर आता कंपन्या पूर्ण क्षमतेने प्लाइट्स चालवत आहेत, त्यामुळे कंपन्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
टॅग्स :spicejetस्पाइस जेटairplaneविमान