Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:48 IST
1 / 7रस्त्यांचे कालवे झाले आहेत. तर बाजारपेठातील परिसरांना तलावाचे स्वरुप आले आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना बाहेर यमुना घरात शिरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजधानी दिल्लीतील काही भागात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.2 / 7प्रदूषित पाण्याने गुदमरत असलेल्या यमुनेने पावसाचा जोर वाढताच आपलं मूळ रुप दाखवलं. धोक्याची पातळी ओलांडत यमुनेच्या पाण्याने विक्रमी पातळी गाठली. गुरुवारी सकाळी नदीपात्रातील पाणी २०७.४८ मीटर इतक्या उंचीवर पोहोचलं होतं.3 / 7पावसाचा जोर कायम असल्याने खवळलेल्या यमुनेच्या पाण्याने दिल्लीतील जवळपासच्या सगळ्या भागांना वेढा दिला. ६३ वर्षात चौथ्यांदा यमुनेचे पाणी विक्रमी पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे अनेक भागातील लोकांना दुसरीकडे हलवण्यात आले.4 / 7दिल्लीचे मुख्यमंत्री, मंत्री आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या मंत्रालयापर्यंत पुराचे पाणी पोहचलं आहे. वासुदेव घाट आणि आजूबाजूच्या भागात पाणी भरले आहे. काही ठिकाणी उभारण्यात आलेल्या मदत छावणीमध्येच पुराचे पाणी शिरले.5 / 7कश्मिरी गेट परिसरातील मरघट वाले हनुमान बाबा मंदिर भागात पाण्यात बुडाला आहे. ८ हजार लोक स्वतःहून घर सोडून छावण्यामध्ये स्थलांतरित झाले आहेत. तर दोन हजाराहून अधिक लोकांना १३ छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. १५ हजार लोक आतापर्यंत छावण्यांमध्ये आले आहेत.6 / 7शहरातील नाले नदीला येऊन मिळतात. मात्र पूर आल्याने नाले वाळू भरलेल्या थैल्यांच्या मदतीने बंद करण्यात आले आहे, जेणेकरून नदीचे पाणी सखल भागात शिरणार नाही.7 / 7यमुनेचं पाणी वाढतच असल्याने एनडीआरएफची पथके तैनान करण्यात आली आहेत. यमुना बाजार, मयूर विहार, लोखंडाचा पूल, बदरपूर आणि जैतपूर गाव या ठिकाणी पथके अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत.