डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:19 IST
1 / 10दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर यामागे षडयंत्र रचणाऱ्या दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचं फरीदाबाद मॉड्यूलबाबत तपास यंत्रणांना विविध धक्कादायक माहिती मिळाली आहे. या मॉड्यूलची महत्त्वाची सदस्य डॉ. शाहीन ना केवळ पाकिस्तानच्या संपर्कात होती तर तिने उत्तर प्रदेशातील कमीत कमी ३० ते ४० डॉक्टरांनाही दहशतवादी नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. 2 / 10इतकेच नाही तर उत्तर प्रदेशात काम करणारे जवळपास २०० मूळ काश्मिरी डॉक्टर आणि मेडिकल विद्यार्थी आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. देशभरात संशयित व्यक्तींची संख्या १ हजाराहून अधिक असल्याचं बोलले जाते. ती पाकिस्तानी सैन्याच्या एका डॉक्टरशी संपर्कात असल्याचेही पुढे आले आहे. 3 / 10सूत्रांनुसार, एनआयए, आयबी, दिल्ली पोलीस आणि एटीएस यांच्या संयुक्त चौकशीत डॉ. शाहीनने पाकिस्तान, मलेशिया, तुर्की, यूएई, मालदीव आणि बांगलादेशापर्यंत तिचे नेटवर्क पसरवलं आहे. श्रीनगरमध्ये झालेल्या चौकशीत तिने पाकिस्तानी सैन्यातील डॉक्टरशीही संपर्कात असल्याचं सांगितले होते. 4 / 10दिल्लीत स्फोट घडवल्यानंतर ती परदेशात पळून जाण्याची तयारी करत होती, ज्यासाठी तिने व्हिसा काढण्यासाठीही अर्ज दिला होता. या मॉड्यूलचे अन्य सदस्य डॉ. आदिल, डॉ. परवेज, डॉ. आरिफ आणि डॉ. फारूखही अटकेत आहेत. या सर्वांची सातत्याने चौकशी सुरू आहे. 5 / 10एटीएसची एक टीम दिल्लीत तैनात आहे. दुसरी टीम श्रीनगरला पाठवण्याची तयारी आहे जेणेकरून हे नेटवर्क मुळापासून उखडून टाकलं जाऊ शकते. डॉ. शाहीनने तिचा भाऊ डॉ. परवेजलाही कट्टरपंथीच्या मार्गावर आणले होते. २०२१ साली तो मालदीवला गेला होता. 6 / 10त्यानंतर शाहीनने त्याचे ब्रेनवॉश करून या मॉड्यूलचा सक्रीय सदस्य बनवला होता. परवेजला शस्त्रे आणण्यापासून नेटवर्कशी जुडलेले डॉक्टरांपर्यंत संदेश पोहचवण्याचं काम दिले होते. शाहीनने त्याला जुने की पॅड असणारे मोबाईल वापरायला सांगितले होते, जेणेकरून त्याचे लोकेशन ट्रेस होऊ नये आणि बॅटरीही दीर्घकाळ चालावी. 7 / 10दरम्यान, हे संपूर्ण मॉड्यूल ४ वर्षापासून तयार केले होते. त्यांच्या टार्गेटवर दिल्लीसह अनेक प्रमुख धार्मिक स्थळे होती. जैश ए मोहम्मदने त्यांच्या या ऑपरेशनसाठी शिक्षित दहशतवाद्यांवर भरवसा ठेवला, त्यातूनच या मॉड्यूलमध्ये डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. 8 / 10जसजसा तपास पुढे जात आहे तसे सुरक्षा यंत्रणा हे नेटवर्क उघड करत आहे. यूपी, दिल्ली, जम्मू काश्मीरमधून सातत्याने रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सध्या अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जात आहे जेणेकरून हे मॉड्यूल उद्ध्वस्त करता येईल.9 / 10दरम्यान, शुक्रवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील एका पोलिस ठाण्यात जप्त केलेल्या स्फोटकांचा मोठा साठा स्फोट होऊन नऊ जण ठार झाले आणि २९ जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 10 / 10हा स्फोट त्या वेळी झाला जेव्हा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटक साहित्याचे नमुने घेत होते. महत्त्वाचे म्हणजे, ही स्फोटके हरियाणातील फरीदाबादमधून अटक केलेल्या डॉ. मुजम्मिल गनई याच्या भाड्याच्या घरातून हस्तगत करण्यात आली होती.