कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:00 IST
1 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर होते. ते राज्यातील पापुम पारे जिल्ह्यात पोहोचले, तेथे त्यांचे स्वागत एक महिला सनदी अधिकारी विशाखा यादव यांनी केले.2 / 9पंतप्रधानांचे अभिवादन करतानाचे विशाखा यादव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर, युजर्सनी यादव यांच्या संदर्भात गुगल करायला सुरुवात केली.3 / 9आयएएस विशाखा यांनी एक्सवर एक पोस्ट करत म्हटले आहे, 'मला राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांचे पापुमपारे जिल्ह्यात स्वागत करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान वाटतो.'4 / 9कोण आहेत विशाखा यादव? विशाखा यादव या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. सध्या त्या अरुणाचल प्रदेशच्या पापुमपारे जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. विशाखा यांनी पंतप्रधानांचे अभिवादन करतानाचे फोटो शेअर केले आहेत.5 / 9विशाखा यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकरी सोडली होती. कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी सनदी सेवा परीक्षेत देशपातळीवर सहावी रँक मिळवली होती.6 / 9अभियंते ते आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास - विशाखा या मुळच्या दिल्लीच्या. त्यांचा जन्म 1994 मध्ये झाला. त्यांचे वडील राजकुमार यादव हे सहायक उप-निरीक्षक आहेत, तर त्यांची आई गृहिणी आहे. आयएएस अधिकारी होण्यापूर्वी त्या अभियंता होत्या.7 / 9दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातून (डीटीयू) अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेंगलोर येथील सिस्को कंपनीत नोकरी सुरू केली. पण त्यांचे स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचे होते.8 / 9त्यासाठी त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तीन प्रयत्नांनंतर त्यांची भारतीय सनदी सेवेसाठी निवड झाली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत 2,025 पैकी 1,046 गुण मिळवले आणि देशभरात सहावी रँक पटकावली होती.9 / 9सनदी अधिकारी विशाखा यादव...