1 / 12मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. 2 / 12तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनला भेट दिली. येथील छत्रपती शिवाजी महारांज्या पुतळ्याला वंदन करुन ते पंतप्रधानांच्या भेटीला निघाले3 / 12पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 4 / 12मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. जवळपास दीड तास ही बैठक सुरू होती. 5 / 12मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 6 / 12'पंतप्रधानांसोबतची भेट औपचारिक स्वरुपाची होती. त्यात मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक चर्चा झाली. मोदींनी संपूर्ण विषय गांभीर्यानं ऐकला. 7 / 12आम्ही याबद्दल त्यांना विस्तृत पत्रं दिली. ते निश्चितपणे हा प्रश्न सोडवतील,' अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.8 / 12मराठा आरक्षणासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल मोदींसोबत चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षण न्यायालयानं रद्द केलं आहे. हा देशपातळीवरील विषय आहे. 9 / 12याशिवाय मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा विषयदेखील संवेदनशील आहे. याबद्दलदेखील मोदींसोबत चर्चा झाली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 10 / 12मोदींसमवेतच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंसोबत अनेकांनी वेगवेगळे कॅप्शन देऊन हे फोटो शेअर केले आहेत. 11 / 12अजित पवार यांची जोधपुरी ड्रेसमधील कडक एंट्री, मुख्यमंत्र्यांचा शांत अन् संयमीपणा, पण तितकाच रुबाबदार पेहरावही या भेटीतील चर्चेचा विषय ठरला12 / 12दिल्ली दरबारी महाराष्ट्र सरकाने ताठ मानेनं आपले प्रश्न मांडले, यावेळी तिन्ही पक्षाच्या सरकारमधील नेत्यांच्या व्हायरल फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यातच, मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रुबाबात पार पडल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली