आता लग्न समारंभांमधूनही CAA, NRCचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:44 AM2019-12-24T11:44:43+5:302019-12-24T11:47:18+5:30

देशात सध्या सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वातावरण तापलं आहे. रस्त्यांवरुन सुरू झालेला निषेध आता लग्न समारंभांपर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे.

अनेक लग्न सोहळ्यांमध्ये वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळी सीएए आणि एनआरसीचा निषेध करत आहेत.

वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येणारी मंडळीदेखील सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा निषेध नोंदवत आहेत.