शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बेळगावात फडकला देशातील सर्वात उंच तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 8:40 PM

1 / 5
बेळगाव : देशातील सर्वात उंच ठरणारा तिरंगा ध्वज सोमवारी (दि.12) बेळगावात फडकला. सुमारे 110 मीटर उंच असलेल्या या राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा किल्ला आवारात पार पडला.
2 / 5
जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला.
3 / 5
संपूर्ण देशातच उंच असा राष्ट्रध्वज बेळगावात फडकवण्यात आल्याने बेळगाववासीयांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
4 / 5
जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी बटन दाबून ध्वजारोहण केले. 3.5 एचपी विद्युत मोटारीच्या साहाय्याने सावकाशपणे हा ध्वज 110 मिटर उंच असणाऱया ध्वजस्तंभावर चढविण्यात आला.
5 / 5
ध्वजारोहण झाल्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीच्या (बँड पथक) जवानानी देशभक्तीपर गीतांची धून सादर केली. यावेळी राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजKarnatakकर्नाटक