CoronaVirus News: भारत लॉकडाऊनआधीच्या स्थितीत पोहोचला; कोरोनाची 'ही' आकडेवारी देतेय दिलासा

By कुणाल गवाणकर | Published: October 26, 2020 03:53 PM2020-10-26T15:53:22+5:302020-10-26T15:58:03+5:30

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाचे ४५ हजार १४९ नवे रुग्ण आढळून आले.

देशातील कोरोना बाधितांच्या एकूण संख्येनं ७९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरात देशात ४८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

२४ तासांत मृत्यूमुखी पडत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहिल्यास भारत लॉकडाऊनच्या आधीच्या स्थितीत पोहोचला असल्याचं म्हणता येईल.

देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दीड टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. २२ मार्चनंतर प्रथमच कोरोना मृत्यूदरात इतकी घट झाली आहे.

देशातील बरीचशी राज्य कोरोना संकटातून बाहेर येत असल्याचंही आकडेवारी सांगते. देशातील १४ राज्यं/केंद्रशासित प्रदेशांमधील मृत्यूदर १ टक्क्यापेक्षा कमी आहे.

देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७९ लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत १.१९ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ७१ लाख जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ७१ लाखांच्या पुढे गेली आहे.

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

देशात सध्याच्या घडीला ६.५ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयसीएमआरनं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत १० कोटी ३४ लाख ६२ हजार ७७८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सध्याच्या घडीला दिवसाला ९ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या सुरू आहेत.