शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात प्लाझ्मा थेरपी किती प्रभावी?, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 9:03 AM

1 / 15
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 15 अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर चार लाख 90 हजारांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे.
2 / 15
कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.
3 / 15
भारतात काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू केले आहेत. ही थेरपी प्रभावी असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
4 / 15
कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. तसेच यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर 50 टक्के कमी झाला असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.
5 / 15
प्लाझ्मा थेरपी मॉडरेट रुग्ण म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांवरच परिणामकारक ठरत आहे अशी माहिती केजरीवाल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
6 / 15
दिल्लीमध्ये सध्या एलएनजेपी आणि राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी मिळाली आहे.
7 / 15
एलएनजेपी रुग्णालयात सर्वात आधी कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार केले. या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. मृत्यूचा दर 50 टक्के कमी झाला आहे.
8 / 15
मुख्यमंत्र्यांनी प्लाझ्मा थेरपी मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांवर जास्त परिणामकारक आहे. अति गंभीर कोरोना रुग्णांना या थेरपीमार्फत वाचवणं कठीण आहे असं म्हटलं आहे.
9 / 15
काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होते.
10 / 15
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे.
11 / 15
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.
12 / 15
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील 800 मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.
13 / 15
जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.
14 / 15
प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोनावर उपचार करण्याचा विचार करणार्‍या रुग्णालये आणि संस्थांना प्रथम संस्थाविषयक एथिक्स कमिटी (IEC) प्रोटोकॉल अंतर्गत क्लिनिकल चाचण्या घेणे आवश्यक आहे.
15 / 15
चाचणी सुरू करण्यापूर्वी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (DCGI) परवानगी घ्यावी लागते. याशिवाय, क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियामध्ये रुग्णालये नोंदवणे देखील आवश्यक आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालIndiaभारतhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूdoctorडॉक्टर