शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाचा वेग मंदावतोय! नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा

By सायली शिर्के | Published: November 03, 2020 10:28 AM

1 / 14
जगातील सर्वच देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे.
2 / 14
जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपली जीव गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून कोरोनावर संशोधन सुरू आहे.
3 / 14
काही दिवसांपूर्वी भारतामध्येही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.
4 / 14
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 82 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे.
5 / 14
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 38,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 490 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 82,67,623 वर पोहोचली आहे.
6 / 14
कोरोनामुळे देशात एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे.
7 / 14
देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (3 नोव्हेंबर) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
8 / 14
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 82,67,623 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,23,097 पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.
9 / 14
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी सध्या 5,41,405 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल 76,03,121 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
10 / 14
कोरोनावर मात केलल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात 76 लाखांहून अधिक लोकांनी व्हायरसवर मात करून कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे.
11 / 14
उपचारानंतर कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे आता जवळपास 90 टक्के झाले आहे.
12 / 14
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या या आकडेवारीने संकटात मोठा दिलासा दिला आहे.
13 / 14
सप्टेंबरच्या मध्यावर शिखर गाठल्यानंतर कोरोनाचा ग्राफ आता 50 टक्क्यांनी खाली घसरला आहे. रुग्ण आणि मृत्यूच्या वाढीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट होत आहे.
14 / 14
कोरोनाचा संसर्ग तीव्र गतीने होत असताना गेल्या एका आठवड्यापासून 50 टक्के कमी रुग्णवाढ होत आहे.कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.50 टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत