शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : जगातलं सगळ्यात मोठं कोविड केअर सेंटर पाहिलंत का?... आपल्याच राजधानीत आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 1:52 PM

1 / 14
चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 1 कोटीच्या पुढे गेली असून 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 14
कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
3 / 14
देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 19,906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 410 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
4 / 14
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 5,28,859 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 16,095 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
5 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आली असून रुग्णावर उपचार सुरू आहेत.
6 / 14
दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत असताना दिल्लीकरांसाठी एक दिलासादायक माहिती आहे. रुग्णांवर वेळेवर आणि तातडीने उपचार करता यावे यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.
7 / 14
राजधानी दिल्लीत जगातील सर्वात मोठं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. सरदार पटेल कोविड केअर सेंटर असं यांचं नाव असून यामध्ये तब्बल 10 हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
8 / 14
कोरोनाची सौम्य लक्षणं आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी दिल्लीमध्ये हे खास सेंटर उभारण्यात आलं आहे. तसेच काही बेड्सना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला आहे.
9 / 14
कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यानुसार सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी देखील असणार आहेत.
10 / 14
वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह 875 पेक्षा जास्त डॉक्टरांना ड्युटीवर असणार आहेत. आयटीबीपीकडे याची जबाबदारी असणार आहे.
11 / 14
कोरोनाग्रस्त सेंटरमध्ये दाखल होण्यापासून ते उपचारानंतर बरे झाल्यावर देण्यात आलेल्या डिस्चार्जपर्यंत सर्व प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक असणार आहेत.
12 / 14
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
13 / 14
अमित शाह यांनी डॉक्टरांशी चर्चा करून सर्व रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच सेंटरमध्ये असलेल्या सोयी-सुविधांबाबत माहिती घेतली आहे.
14 / 14
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सर्वात मोठ्या कोविड सेंटरसाठी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAmit Shahअमित शहाIndiaभारतhospitalहॉस्पिटल