शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 12:04 IST

1 / 12
कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. दिवसागणिक धोका वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 7,42,417 वर पोहोचली आहे.
2 / 12
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 22,752 नवे रुग्ण आढळले असून 482 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 20,642 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
3 / 12
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना काही दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. देशभरात 4,56,831जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
4 / 12
होम आयसोलेशन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, मास्कच्या माध्यमातून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे. प्रशासनाने लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.
5 / 12
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. देशात गेल्या 24 तासांत 2.62 लाख कोरोना चाचण्या झाल्या असून पहिल्यांदाच हा आकडा 2.5 हून जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
6 / 12
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरात आतापर्यंत तब्बल एक कोटी लोकांनी कोरोना चाचणी केली आहे.
7 / 12
इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, देशात 2 लाख 62 हजार 679 लोकांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 1,04,73,771 लोकांची चाचणी झाली आहे.
8 / 12
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याने अधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 12
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हापासून संशयित रुग्णांची चाचणी केली जात आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर खासगी प्रयोगशाळांना चाचणीची परवानगी देण्यात आली.
10 / 12
कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घेण्याची अनेक ठिकाणी अट ठेवण्यात आली आहे. मात्र आता मुंबई महापालिकेने ही अट काढून टाकली आहे.
11 / 12
मुंबईत संशयित रुग्णांना कोणत्याही वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय कोरोना चाचणी करून घेता येणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध तत्काळ लागावा, यासाठी हा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
12 / 12
रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान उभे राहिले. अशा वेळी ई-प्रिस्क्रिप्शनची सूट मुंबईत दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याने त्यांच्यासाठी ही अट शिथिल करण्यात आली होती.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूMumbaiमुंबई