शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 1:21 PM

1 / 14
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 70,000 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 2200 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 14
डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.
3 / 14
कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. याच दरम्यान 9 महिन्यांची गर्भवती नर्स कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहे.
4 / 14
रूपा राव असं या 9 महिन्यांच्या गर्भवती नर्सचं नाव असून ती कर्नाटकातील शिवमोगा येथे राहते.
5 / 14
कर्नाटकातील एका सरकारी रुग्णालयात दररोज 6 तास ड्यूटी करून ती कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहे.
6 / 14
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रूपा राव यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
7 / 14
9 महिन्यांच्या या गर्भवती रुपाला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र तरी ती कोरोनाग्रस्तांसाठी 6 तास काम करत आहेत.
8 / 14
'सरकारी रुग्णालयात आजूबाजूच्या गावातील लोक येतात. त्यामुळे लोकांना माझी गरज आहे. माझ्या वरिष्ठांनी मला सुट्टी घेण्यास सांगितले होते. मात्र मला लोकांची सेवा करायची आहे' असं रुपा यांनी म्हटलं आहे.
9 / 14
रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्वांनीच रुपाच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.
10 / 14
गजानुरू गावात राहणारी रूपा रोज रुग्णांची सेवा करण्यासाठी थिरथाहल्लीच्या सरकारी रुग्णालयात येते. न थकता, न थांबता रुग्णांची सेवा करते.
11 / 14
काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावे यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सने तब्बल 250 किमीचा प्रवास केल्याची प्रेरणादायी घटना समोर आली होती.
12 / 14
विनोथिनी असं या 25 वर्षीय नर्सचं नाव असून ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तिने तामिळनाडूतील तिरुचिरा ते रामनाथुरमपर्यंत तब्बल 250 किमी अंतर प्रवास केला आहे.
13 / 14
रामनाथपुरम येथील स्वास्थ सेवा संयुक्त निर्देशक यांचा कॉल आला. कोरोना रुग्णांवर उपचारासंदर्भात तो कॉल होता. विनोथिनीने वेळ वाया न घालवता प्राथमिक स्वास्थ रुग्णांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल 250 किमी प्रवास करुन ती रुग्णालयात पोहोचली.
14 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्या