शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! "देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ, तयार राहा"; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 6:23 PM

1 / 16
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 15 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे.
2 / 16
कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.
3 / 16
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. रुग्णसंख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याने कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत.
4 / 16
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे.
5 / 16
कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज कोरोनाचे तब्बल तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
6 / 16
केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी माहिती दिली.
7 / 16
केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. भारतात करोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे असं म्हटलं आहे.
8 / 16
'सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं' असं राघवन यांनी म्हटलं आहे.
9 / 16
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,82,315 रुग्ण आढळले आहेत. अशी 12 राज्ये आहेत जिथे 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
10 / 16
7 राज्यांत 50,000 ते 1,00,000 सक्रिय रुग्ण आहेत. तर 17 राज्यांत 50,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे पॉझिटिव्हीची रेट हा 15 टक्क्यांहून अधिक आहे.
11 / 16
अग्रवाल यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये मृत्यूची संख्या अधिक असल्याचं म्हटलं आहे. तसेच काही ठिकाणी चिंताजनक परिस्थिती आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
12 / 16
बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे.
13 / 16
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 34,87,229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,69,51,731 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 16
कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहे. हे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
15 / 16
कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती भयंकर होत आहे.
16 / 16
कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती भयंकर होत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू