काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:25 IST
1 / 6 काँग्रेसचे युवा नेते आणि हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह हे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले आहेत. विक्रमादित्य सिंह यांचं हे दुसरं लग्न असून, चंडीगडमधील डॉ. अमरीन कौर यांच्याची त्यांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. 2 / 6विक्रमादित्य सिंह हे काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते आणि हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. तर विक्रमादित्य सिंह यांच्या आई प्रतिभा सिंह ह्या सध्या काँग्रेसच्या हिमाचल प्रदेशमधील प्रदेशाध्यक्षा आहेत. 3 / 6विक्रमादित्य सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी अमरीन कौर यांनी मानसशास्त्र विषयामध्ये पीएचडी केली आहे. तसेच ती चंडीगड येथील पंजाब विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे. डॉ. अमरीन कौर या पंजाब-हरयाणा हायकोर्टामधील वरिष्ठ वकील जोतिंदर सिंह सेखो यांच्या कन्या आहेत. तसेच त्यांच्या आईचं नाव ओपिंदर कौर आहे. 4 / 6डॉ. अमरीन कौर या लेखिकासुद्धा आहे. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. विक्रमादित्य सिंह त्यांचे जुने मित्र असून, विक्रमादित्य सिंह यांच्या त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत झालेल्या घटस्फोटामागील एक कारण अमरीन कौर ह्यासुद्धा होत्या. अमरीन कौर आणि विक्रमादित्य सिंह यांचं अफेअर होतं असा आरोप विक्रमादित्य सिंह यांच्या पहिल्या पत्नीने केला होता. 5 / 6अमरीन कौर यांचं कुटुंब मुळचं संगरूर जिल्ह्यातील कलबंजारा गावातील रहिवासी आहे. सध्या ते चंडीगड जिल्ह्यातील सेक्टर २ मध्ये राहतात. 6 / 6विक्रमादित्य सिंह यांचा पहिला विवाह ८ मार्च २०१९ मध्ये राजस्थानमधील मेवाड येथे राजसमंद येथील आमेट राजघराण्यातील सुदर्शना सिंह चुंडावत यांच्याशी झाला होता. मात्र २०२२ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत सुदर्शना सिंह यांनी विक्रमादित्य सिंह यांच्या कुटुंबीयांविरोधात उदयपूर येथील कोर्टात खटला दाखल केला होता. तसेच विक्रमादित्य सिंह यांचे अमरीन कौर यांच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर गतवर्षी दोघेही परस्पर सहमतीने विभक्त झाले होते.