1 / 6गेल्या काही वर्षांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे पूर्वी शहरी भागांपुरताच मर्यादित असलेल्या गॅस सिलेंडरचा वापर आता ग्रामीण भागामध्येही होतो. गॅस सिलेंडरची हाताळणी ही अगदी सावधतेने करणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण गॅस सिलेंडर घेताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती घेऊयात. 2 / 6गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयकडून सिलेंडर घेताना त्याच्या वजनाची पडताळणी करून घेतली पाहिजे. सिलेंडरचं वजन त्यावर लिहिलेलं असतं. जर त्यापेक्षा कमी वजन असेल तर सिलेंडर घेता कामा नये. 3 / 6सर्वात महत्त्वाची बाब म्हजणे गॅस सिलेंडर घेताना डिलिव्हरी बॉयकडून लिकेज तपासून घेतलं पाहिजे. जर तपासणी करताना जर सुई वर आलेली असेल तर त्याचा अर्थ सिलेंडरमधून गळती होत आहे असा होतो. 4 / 6त्याबरोबरच सिलेंडरवर लिहिलेली एक्सपायरी डेटसुद्धा तपासली पाहिजे. हे आकडे A, B, C, D अशा क्रमाने लिहिलेले असतात. हे आकडे वर्ष दर्शवतात. 5 / 6सर्वसाधारणपणे सिलेंडरमध्ये दोन कारणांमुळे स्फोट होतो. गॅस लिक झाल्याने शेगडीमधून सिलेंडरपर्यंत आग पोहोचते. दुसरं कारण म्हणजे सिलेंडरची एक्स्पायरी डेट झालेली असेल तर असा सिलेंडरसुद्धा स्फोटाचं कारण ठरू शकतो. 6 / 6 वाचकांनो ही माहिती केवळ सर्वसाधारण माहितीवर आधारित असून, ती जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दिली आहे. Lokmat.Com त्याला दुजोरा देत नाही.