शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'बॉब कट' हेअरस्टाईलने फेमस झाला हत्ती, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By महेश गलांडे | Published: November 07, 2020 8:21 PM

1 / 9
तामिळनाडूतील एका हत्तीच्या हेअरस्टाईलची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून ही मादा हत्तीण चांगलीच फेमस झाली आहे.
2 / 9
मन्नारगुडी येथील या बॉब कट हत्तीणीला पाहण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिराबाहेर गर्दी करत आहेत. सेंगमलम असं या हत्तीणीचं नाव असून राजागोपालस्वामी यांच्या मंदिरात तिचं सध्याचं वास्तव्य आहे.
3 / 9
बॉब कट हेअरस्टाईमुळे ही हत्तीण चर्चेचा विषय बनला आहे, त्यामुळे या हत्तीला बॉब कट सेंगमलम असंही म्हटलं जातंय.
4 / 9
सन 2003 मध्ये केरळमधून या हत्तीणीला आणण्यात आले होते. दिवसातून एकदा तिचे केस धुतले जातात.
5 / 9
विशेष म्हणजे उन्हाळ्यात दिवसांतून तीनवेळा तिचे केस पाण्याने धुवून स्वच्छ केले जातात. बॉब कट हत्तीणीला पाहण्यासाठी आलेले भाविक आवर्जून खायला काहीतरी घेऊन येतात. हत्तीणीच्या आवडीचे पदार्थ दिला देतात.
6 / 9
तामिळनाडूतील या हत्तीच्या हेअर स्टाईलचा भन्नाट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी हा फोटो इंडीयन फॉरेस्ट ऑफिसर सुधा रामन यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता.
7 / 9
या फोटोला जास्त लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. महावत राजगोपाल हे या हत्तीची देखभाल स्वतःच्या मुलाप्रमाणे करतो.
8 / 9
मला आधीपासूनच या हत्तीला खास लुक द्यायचा होता. एकदा मी इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिला होता. त्यातील हत्तीचा बॉब कट मला खूप आवडला त्यानंतर मी सेनगामलमचे केस अशा स्टाईलने कापण्याचा विचार केला. पण हत्ती जेव्हा स्थिर राहतो तेव्हाच केस कापणं शक्य असते. अन्यथा हे खूप कठीण काम आहे, असे महावतने सांगितले.
9 / 9
बॉब-कट सेनगामलम च्या आगळ्या वेगळ्या लुकला सोशल मीडिया युजर्सनी पसंती दर्शवली आहे. लोकांनी या व्हिडीयोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हत्तीच्या डोक्यावरील केस शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूSocial Viralसोशल व्हायरल