शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bird Fluचा कहर, चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध, अशी घ्या काळजी; WHOचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 2:41 PM

1 / 15
देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गंभीर परिस्थिती असतानाच आता 'बर्ड फ्लू'च्या उद्रेकानं सगळ्यांची चिंता वाढवली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला आहे.
2 / 15
'बर्ड फ्लू'मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू संख्येनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
3 / 15
देशातील पाच राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, राज्यस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश व केरळ यांचा समावेश आहे. तसेच काही राज्यांमध्ये देखील बर्ड फ्लूचा धोका पाहायला मिळत आहे.
4 / 15
बर्ड फ्लू H5N1 व्हायरस हा जंगली पक्ष्यांमध्ये आढळून येतो पण ते याने आजारी नसतात. मात्र ते जंगली पक्षी या व्हायरसने कोंबडी, बदक, कावळे, कबूतरे व मोर अशा सर्व पक्ष्यांना संक्रमित करतात.
5 / 15
देशातील अनेक राज्यांमध्ये आतापर्यंत या व्हायरसमुळे गेल्या 10 दिवसांत लाखो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांत 12,000 बदकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कर्नाटक व तामिळनाडूत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर जम्मू-काश्मीर व हरियाणाने आपापल्या राज्यांत नमुने घेऊन चाचणी करण्यास सुरूवात केली आहे.
6 / 15
H5N1 व्हायरस हा पक्ष्यांमध्ये आढळून येतो. त्यामुळे जे लोक मीट सप्लाय करतात त्यांनी काळजी घेतली पाहिजे की फुड चेनमध्ये कोणताच असा पक्षी आला नाही पाहिजे जो संक्रमित आहे.
7 / 15
सरकारी आदेशांनुसार पोल्ट्री फुड प्रोडक्ट्सच्या विक्रीवर प्रतिबंध आणले गेले आहेत व याच्या सेवनावरही बंदी घातली गेली आहे. तुम्ही कोणत्याही पोल्ट्री प्रोडक्ट्सचं सेवन करत असाल तर ते 70 डिग्री सेल्सियस किंवा त्याच्यापेक्षा जास्त आचेवर शिजवून घ्या.
8 / 15
कच्च्या व शिजवलेल्या चिकनसाठी वेगवेगळे चाकू व भांडी वापरण्याचा सल्ला देण्याचा सल्ला दिला गेला आहे. कच्ची किंवा उकडलेली कोणतीही अंडी खाणं टाळा.
9 / 15
पक्ष्यांइतका माणसांना बर्ड फ्लूचा धोका नाही. संक्रमित असलेल्या पक्ष्याच्या किंवा प्राण्याच्या संपर्कात आल्यास व्यक्तीला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच जे लोक अंडी किंवा चिकन चांगलं शिजवून खात नाहीत त्यांना देखील हा धोका आहे.
10 / 15
व्हायरसबाबत 2005 मध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सल्ला दिला होता. जर तुम्ही चिकन, अंडी, मीट चांगलं आतून बाहेरून शिजवून खात असाल तर तुम्हाला बर्ड फ्लू H5N1 व्हायरसचा कोणताही धोका उद्भवणार नाही.
11 / 15
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, 70 डिग्री सेल्सियस तापमानावर चिकन किंवा अंडी शिजवली गेली पाहिजेत. तज्ज्ञांनी व्हायरसने संक्रमित पक्ष्यांच्या घोळक्यातून फुड चेनमध्ये प्रवेश केला असेल तर लोकांना चिकन व अंडी खाल्ल्यानंतर बर्ड फ्लू आपल्या विळख्यात घेऊ शकतो असं म्हटलं आहे.
12 / 15
चिकन किंवा अंडी म्हणूनच चांगली शिजवून व उकडवून मगच खा, कच्चेपणा राहू देऊ नका. यामुळे कोणताही धोका उरणार नाही. एम्सचे एफएक्यूस (FAQs) नुसार, बर्ड फ्लू मानव जातीला कधीच संक्रमित करायचा नाही पण 1997 पासून या व्हायरमुळे अनेक लोक आजारी पडले होते.
13 / 15
'बर्ड फ्लू'चे पक्ष्यांमधून मानवामध्ये संक्रमण होण्याचाही धोका वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या 'बर्ड फ्लू'ला आपल्यापासून दूर कसं ठेवायचं? यासाठी पुढील गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. अर्धवट उकडलेली अंडी, अर्धवट शिजवलेलं चिकन, पक्ष्यांशी थेट संपर्क टाळा, कच्चे मांस उघड्यावर ठेवणं टाळा आणि कच्च्या मांसाशी थेट संपर्क टाळा.
14 / 15
आपण मृत पक्ष्यांना उघड्या हातांनी स्पर्श करणं टाळायला हवं. वारंवार हात धुत राहणं आणि स्वत:च्या स्वच्छतेची जास्तीत जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं. मास्क आणि हँडग्लोजचा वापर करावा.
15 / 15
पूर्णपणे शिजवलेलं अन्न खाणं ही काळजी आपण सहजपणे घेऊ शकतो. खोकला, ताप, घशात खवखवणे, स्नानूंमध्ये ताण, डोकेदुखी, श्वसनास त्रास होणे ही बर्ड फ्लूची लक्षणं आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य