राजकारणासाठी भगवंत मान यांनी सोडला होता परिवार, लोकांनी स्टंट म्हणून केलं होतं ट्रोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:24 IST
1 / 8आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये मोठं यश मिळालं. मोठमोठ्या नेत्यांना धूळ चारत आपने पंबाजमध्ये सत्ता स्थापन केली. या सगळ्यात आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांची मेहनत कामी आली. हे तेच भगवंत मान आहेत ज्यांनी राजकारणासाठी आपल्या परिवाराचा त्याग केला होता. त्याच भगवंत मान यांनी पंबाजच्या राजकारणात मोठं यश मिळवलं.2 / 8पंजाबचा भार आपल्या खांद्यावर घेण्यासाठी भगवंत मान यांनी खाजगी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या निर्णयावर टिकाही करण्यात आली जेव्हा त्यांनी राजकारणाला प्राथमिकता देऊन परिवार सोडला. ते वाईट प्रकारे ट्रोल झाले होते. 3 / 8२०१५ मध्ये भगवंत मान यांचं परिवार बिथरला होता. भगवंत मान यांचा पत्नी इंदरजीत कौरसोबत घटस्फोट झाला होता. भगवंत मान यांना दोन मुलं आहेत. पण ती मुलंही त्यांच्यासोबत बोलत नाहीत. याचा खुलासा भगवंत मान यांनीच एका मुलाखतीत केला होता. 4 / 8त्यांच्यानुसार, त्यांचं मुलांसोबत फोनवर बोलणंही होत नाही. भगवंत यांनी स्वत: मान्य केल की, परिवाराला वेळ देऊ शकत नसल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्यापासून दूर जाणं पसंत केलं. नंतर दोघांच्या सहमतीने दोघांचा घटस्फोट झाला. भगवंत आता घटस्फोट झाल्यावर पंजाबलाच आपला परिवार मानतात.5 / 8२०१५ मध्ये भगवंत मान यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी लिहिलं होतं की, त्याने परिवाराला सोडून पंजाबला निवडलं. राजकारणासाठी ते पत्नीपासून वेगळे होत आहेत.6 / 8भगवंत मान यांची ही पोस्ट लोकांना आवडली नव्हती. कारण मान यांच्या एक्स वाइफनेच त्यांच्या राजकीय करिअरमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. त्या मान यांच्या अनेक रॅलीमध्ये सामिल झाल्या होत्या. प्रत्येक वळणावर मान यांना साथ दिली. अनेकांना हा मान यांचा पब्लिसिटी स्टंट वाटला होता.7 / 8भगवंत मान यांनी २०११ मध्ये राजकारणात एन्ट्री घेतली होती. राजकारणात येण्याआधी भगवंत मान हे अनेक कॉमेडी शोमध्ये दिसले होते. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये ते दिसले होते. काही पंजाबी सिनेमातही ते दिसले.8 / 8भगवंत मान यांचा पहिली कॉमेडी अल्बम जगतार जग्गीसोबत होता. १० वर्ष सोबत काम केल्यानंतर त्यांची जोडी तुटली होती. यानंतर त्यांची जोडी राणा रणबीरसोबत जमली. त्यांचा दुसरा अल्बम कुल्फी गरमा गरमा हिट झाला होता.