शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगप्रसिद्ध 'या' दोन गावांमध्ये परस्परांशी होत नाही सोयरीक; कारण वाचून थक्कच व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:04 PM

1 / 10
भगवान श्रीकृष्ण अन् राधाचं नातं हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या प्रेमाच्या कथाही आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. राधा ही भगवान श्रीकृष्णांची निस्सीम भक्त होती.
2 / 10
राधा आणि भगवान श्रीकृष्णाच्या कथेनुसारच त्यांची गावंसुद्धा प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेशातील बरसाना आणि नंदगाव ही गावंसुद्धा होळीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत येत असतात.
3 / 10
लठमार होळी पाहण्यासाठी इथे देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही गावांतील लोकांचे परस्परांशी संबंध खूप चांगले संबंध आहेत, तरीसुद्धा दोन्ही गावांतील लोकांनी आजवर एकमेकांशी कधीच सोयरीक केलेली नाही.
4 / 10
या दोन्ही गावांमध्ये सोयरीक न होण्याच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सखी राधा यांची अमर प्रेमकहाणी असल्याचे म्हटले जाते. राधा बरसाना गावाची राहणारी होती, तर श्रीकृष्ण नंदगावातले रहिवासी होते.
5 / 10
या दोघांचा विवाह झाला नसला, तरी या दोघांची प्रेमकहाणी अतिशय पवित्र मानली जाते. श्रीकृष्णाला बरसाना गावाचे जावई आणि राधेला नंदगावाची सून मानले जाते.
6 / 10
. बरसाना गावाचे जावई केवळ श्रीकृष्ण आणि नंदगावाची सून केवळ राधा अशी मान्यता असल्यामुळे इतर कोणाचीही सोयरिक दोन्ही गावांतील लोक करीत नाहीत.
7 / 10
या परंपरेच्या अनुसार राधा बरसाना गावाची लेक आणि नंदगावाची सून मानली जाते. आपल्याकडे असलेल्या प्रथेनुसार मुलीच्या सासरच्या घरी तिचे आईवडील किंवा कोणी नातेवाईक गेल्यानंतर तेथील पाणीही न पिण्याची पद्धत आहे.
8 / 10
हीच पद्धत अनुसरून आजच्या काळामध्ये बरसाना गावातील वयस्कर लोक जर नांदगावात गेले, तर आजही तेथील पाणी पीत नसल्याचे म्हटले जाते.
9 / 10
तसेच नंदगावामधून बरसानामध्ये पाहुणे मंडळी आल्यास, ती मुलीच्या सासरहून आली आहेत, असे समजून त्यांचे यथायोग्य मानपान करण्याची प्रथा येथे रूढ आहे.
10 / 10
तसेच नंदगावामधून बरसानामध्ये पाहुणे मंडळी आल्यास, ती मुलीच्या सासरहून आली आहेत, असे समजून त्यांचे यथायोग्य मानपान करण्याची प्रथा येथे रूढ आहे.