शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कारच्या बॅकसीटवर ३ जण, पण दोघांनी सीटबेल्ट लावला असेल तरी दंड बसणार? ट्राफिक नियमाचा गुंता समजून घ्या...

By ओमकार संकपाळ | Published: September 15, 2022 4:15 PM

1 / 7
कारच्या मागच्या सीटवर तुम्ही सीट बेल्ट वापरत नसाल तर काळजी घ्या! कारण दिल्लीसह अनेक राज्यांच्या वाहतूक पोलिसांनी दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. कारची आसनक्षमता आधीच ठरलेली असते, त्याचप्रमाणे सीट बेल्टही असतात. पण तरीही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असतील तरीही दंड आकारला जाणार आहे. सीटबेल्टबाबतचा नेमका नियम काय सांगतो जाणून घेऊयात...
2 / 7
एक पावती सीटबेल्ट न घातल्याबद्दल आणि दुसरी पावती ओव्हर लोडींगसाठी (मागील सीटवर 2 ऐवजी 3 प्रवासी) फाडली जाईल. मागचा तिसरा प्रवासी लहान असला तरीही सीटबेल्ट अनिवार्य आहे. वाहतूक नियम आता कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांची एकदा उजळणी करणं गरजेचं आहे. नाहीतर मोठा फटका बसू शकतो.
3 / 7
बहुतेक वाहनांमध्ये मागील सीटसाठी बेल्ट असतात, परंतु ते वापरले नाहीत तर रिमाइंडर अलर्ट वाजत नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी बॅकसीटवर बेल्ट रिमाइंडर देखील अनिवार्य केले जाईल असं नुकतंच म्हटलं आहे. सर्व सीटवर बेल्ट घालणं बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम 194B नुसार, सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जातो. सीटबेल्ट न घातल्याबद्दल दंडाशी संबंधित अनेक प्रश्न देखील आहेत ज्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्रालय यासंदर्भात लवकरच याची अधिसूचना जारी करणार असल्याचं वृत्त आहे.
4 / 7
लहान मुलांना मागच्या सीटवर बसवताना सीटबेल्ट लावला नाही तरी चालतो असा भ्रम आहे. लहान मूल समोरच्या सीटवर असो किंवा मागच्या सीटवर असो, त्याला सीट बेल्ट घालणं आवश्यक आहे. वाहतुकीच्या इतर पद्धतींप्रमाणे, मुलांना खासगी वाहनांमध्ये सुरक्षेबाबत कोणतीही सूट मिळत नाही. त्यांनाही वाहतुकीचे सर्व नियम लागू होतात. जर मूल लहान असेल तर त्याला आपल्या मांडीवर बसवा आणि नंतर त्याला झाकणारा सीट बेल्ट घाला.
5 / 7
अनेकदा असं दिसून येतं की ४ सीटर कारमध्ये लोक मागच्या सीटवर तीन ते चार लोक बसतात. अशा वाहनाला दंड आकारला जाणं निश्चित आहे. वाहनाच्या आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेल्यास 'ओव्हरलोडिंग' होईल. प्रत्येक जादा प्रवाशामागे एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यात सीट बेल्ट लावला नसेल, तर त्याचा स्वतंत्रपणे दंड आकारला जाईल.
6 / 7
नुकतेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, कारमध्ये बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. तसंच कार निर्मात्यांना मागील सीटसाठी सीट बेल्ट अलार्म सिस्टम अनिवार्य करण्याची योजना असल्याचंही ते म्हणाले.
7 / 7
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. ते कारच्या मागच्या सीटवर बसले होते पण त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. यानंतर मागच्या सीटवर बसून प्रवास करणाऱ्यांना सीट बेल्ट बंधनकारक करण्याचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस