बापरे! 'महाकुंभ'च्या ४५ दिवसांत कमावले तब्बल ३० कोटी; कोण आहे प्रयागराजचा पिंटू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 09:40 IST
1 / 10नुकताच प्रयागराज इथं १४४ वर्षानंतर आलेला महाकुंभ मेळा पार पडला. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या काळात चाललेल्या या धार्मिक सोहळ्यांना देशभरातून कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली. त्रिवेणी संगमावर दररोज लाखो भाविक गंगेच्या पाण्यात स्नान करत होते. या सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले2 / 10त्यातच छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी महाकुंभ एक पर्वणीच ठरली. या महाकुंभ मेळ्यात एकीकडे धर्म आणि अध्यात्म यावर चर्चा झाली तर दुसरीकडे महाकुंभ मेळ्यातून होणाऱ्या कमाईनेही लोकांचं लक्ष वेधलं. कुणी चहा विकत होते, तर कुणी नाष्टा, एक युवकाने दात घासण्यासाठी कडुलिंबाच्या काडी विकून पैसे कमावले.3 / 10महाकुंभ मेळ्यातील एका नावाडी कुटुंबाच्या कमाईची सध्या जोरदार चर्चा होत आहे कारण या कुटुंबाने महाकुंभच्या ४५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ३० कोटी रूपयांची कमाई केली आहे. या कुटुंबाने बोट चालवून ही कमाई केली आहे. या कुटुंबाचं कौतुक खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही केले. 4 / 10हे नावाडी कुटुंब प्रयागराजच्या नैनी इथल्या अरैल येथे राहणारे आहे. या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय बोट चालवणे आहे. महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकमेकांना मिठाई भरवत होते. या आनंदामागचं कारण होतं ते म्हणजे महाकुंभ मेळ्यातील या कुटुंबाच्या कमाईचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला.5 / 10महाकुंभ मेळ्यात ४५ दिवसांत जवळपास ६६ कोटीहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. ज्यामुळे या नावाडी कुटुंबाला ४५ दिवस खूप काम मिळाले, असा एकही दिवस नव्हता ज्यात त्यांची बोट रिकामी चालली. या कुटुंबाकडे १०० हून अधिक बोटी आहेत. त्यांच्या प्रत्येक बोटीने ७ ते १० लाख कमाई केली आहे.6 / 10४५ दिवसात या कुटुंबाची एकूण कमाई पाहिली तर ती ३० कोटींच्या घरात जाते. या नावाडी कुटुंबातील सदस्य पिंटू महरा आणि त्यांची आई शुक्लावती यांच्या चेहऱ्यावर इतक्या मोठ्या कमाईचा आनंद दिसून येतो. योगी सरकारने जे महाकुंभचं आयोजन केले त्यामुळे भाविकांची संख्या वाढली, त्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं असं हे कुटुंब सांगते.7 / 10महरा कुटुंबात ५०० हून अधिक सदस्य बोट चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे १०० हून अधिक बोट आहेत. आसपासच्या लोकांनीही त्यांच्याकडून बोट घेऊन लोकांना स्नानासाठी घाटावर घेऊन जायचे. महाकुंभमुळे आम्हाला रोजगार मिळाला, त्याशिवाय सन्मानही मिळाला. इतका पैसा नावाड्यांनी पहिल्यांदाच पाहिला असेल असं शुक्लावती महरा यांनी सांगितले.8 / 10विविध घाटांपासून पवित्र संगमापर्यंत आत जाण्यासाठी भाविकांकडून नाव व मोटारबोट्सचा वापर करण्यात येत होता. प्रयागराजसोबत उत्तर प्रदेश व बिहारमधूनदेखील अनेक नावाडी आल्याची माहिती स्थानिक बोटचालकांनी दिली होती. महाकुंभ प्रशासनाकडून बोटिंगसाठी ४५ रुपये ते १२५ रुपये इतके दर निश्चित करण्यात आले होते. मात्र कोट्यवधी भाविकांची गर्दी लक्षात घेता नावाडी व बोट कंत्राटदारांकडून तब्बल दहा पटींहून अधिक दर आकारले गेले.9 / 10महाकुंभ आस्था आणि श्रद्धा यांचे दर्शन दाखविणारा ठरला असला तरी स्थानिकांनी निरनिराळ्या माध्यमांतून यातून अर्थकारणदेखील साधले आहे. मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद होती, त्यावेळी कोट्यवधी भाविकांसाठी स्थानिक मोटारसायकलस्वार तरुण हेच सारथी झाले. अनेकांनी महिन्याभरात यातूनही लाखो रुपयांची कमाई केली आहे.10 / 10महाशिवरात्री दिवशी प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी २ दिवस आधीच गर्दी जमली होती. पहाटे साडेतीन वाजल्यापासून लोकांनी संगमावर आंघोळ करण्यास सुरुवात केली. भूतान व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, जपानसह ५० हून अधिक देशांतील लोक महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी आले होते.