शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गाय घरात येताच पालटलं मुंबईतील व्यावसायिकाचं नशीब, तिची ठेवली जाते शाही बडदास्त, राहते एक कोटीच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 8:05 PM

1 / 6
राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील धानोल गावामध्ये एक गाय चर्चेचा विषय ठरली आहे. ही गाय एक कोटींच्या घरात राहते. तिची देखभाल करण्यासाठी २४ तास चार जण तैनात असतात. तिला थोडंही दुखलं खुपलं तर त्वरित डॉक्टरांना बोलावले जाते. ही गोष्ट आहे व्यावसायिक नरेंद्र पुरोहित यांच्या घरात राहणाऱ्या राधा या गाईची. पुरोहित हे मुंबईत बीएमसीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. तसेच त्यांचा इलेक्ट्रिक टू व्हेईकल्स मेन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे.
2 / 6
नरेंद्र पुरोहित यांना गाईंच्या प्रति लहानपणापासूनच आदरभाव होता. दरम्यान, आपणही घरी गाय आणावी, असे त्यांना वाटले त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी गोशाळेतून एक गाय घरी आणली. तिचं राधा असं नामकरण केलं.
3 / 6
दरम्यान, ही राधा घरी आल्यापासून पुरोहित यांचं नशीब पालटलं. त्यांचा व्यवसाय वाढला. त्यामुळे नरेंद्र पुरोहित यांच्या मनात राधा गाईविषयी असलेला आदरभाव भक्तिभावामध्ये बदलला. नरेंद्र पुरोहित यांची पत्नी विमला पुरोहित, मुली सपना आणि निकिता, मुलगे परेश आणि अभिजित राधा हिची दररोजा आरती करतात. तिच्यासाठी घरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तिला पाहिल्याशिवाय नरेंद्र भोजनही करत नाहीत. राधाची सेवा करण्यासाठी ते महिन्यातून १० दिवस गावी येतात. जेव्हा नरेंद्र पुरोहित मुंबईत असतात तेव्हा त्यांचे आई-वडील राधाची सेवा करतात.
4 / 6
नरेंद्र पुरोहित यांनी दोन वर्षांपूर्वी एक कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला आहे. राधा ही त्याच बंगल्यात राहते. तसेच तिचा घरात सर्वत्र वावर असतो.
5 / 6
राधाची शाही बडदास्त ठेवली जाते. तिल्या खाण्यामध्ये देशी तुपापासून बनलेल लापशी आणि लाडू दिले जातात. कधी कधी तिला सुका चाराही दिला जातो.
6 / 6
राधाबरोबरच नरेंद्र पुरोहित यांच्याकडे २७ अजून गाई आहेत. त्या बंगल्याबाहेर असलेल्या फार्महाऊसमध्ये राहतात. त्यांच्या देखभालीसाठीही लोक ठेवण्यात आले आहेत. मात्र राधाच्या देखभालीसाठी चार खास लोकांची नियुक्ती केली आहे. ते राधाला आंघोळ घालण्याचे, मालिश करण्याचे, सजवण्याचे, भरवण्याचे काम करतात.
टॅग्स :cowगायRajasthanराजस्थानMumbaiमुंबई