शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पदभार स्वीकारताच नव्या IAF प्रमुखांचा पाकला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:17 PM

1 / 6
व्हाइस चीफ एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सोमवारी भारतीय हवाई दल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे.
2 / 6
हवाई दलाचे प्रमुख असलेले बी. एस. धनोआ 30 सप्टेंबरला निवृत्त झाले. त्यांच्या जागी राकेश कुमार सिंह भदौरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
3 / 6
हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकरताच राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला आहे.
4 / 6
भारत ‘राफेल’मुळे चीन व पाकिस्तानवर भारी पडेल, असे राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी म्हटले आहे.
5 / 6
राकेश कुमार सिंह भदौरिया याआधी 'राफेल' लढाऊ विमान खरेदी समितीचे अध्यक्ष सुद्धा होते.
6 / 6
भदौरिया 15 जून 1980 पासून हवाई दलाच्या सेवेत आहेत. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल