शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मला विरोधकांची पर्वा नाही; वसीम रिझवींनंतर अनेकांना व्हायचेय हिंदू, यती नरसिंहानंद यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 9:38 AM

1 / 9
सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांची यादी मोठी आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील दसना देवी मंदिराचे महंत आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद (Yeti Narasimhanand) म्हणाले, सनातन धर्म हा विश्वातील सर्वात मोठा धर्म आहे. वसीम रिझवीच्या (Wasim Rizvi) धर्मांतरानंतर हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी अनेक लोक त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. हा धर्म निर्माण करणारा आणि कल्याणकारी आहे. काही लोकांचा विरोध होत असला तरी त्यांना त्याची पर्वा नाही.
2 / 9
उत्तर प्रदेशच्या शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सोमवारी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. या बदलानंतर राजकीय वर्तुळात आणि समाजात मोठी चर्चा सुरू आहे. वसीमचे जितेंद्र नारायण (Jitendra Narayan Tyagi) झालेले वसीम रिझवी मंगळवारी दिवसभर नरसिंहानंद यांच्यासोबत होते. ते दिल्ली एनसीआर आणि गुरुग्राम या दोन्ही ठिकाणी गेला.
3 / 9
जितेंद्र नारायण (वसीम रिझवी) यांनी सांगितले की, अनेक लोक इस्लाम सोडून स्वेच्छेने सनातन धर्म स्वीकारण्यास इच्छुक आहेत. हिंदू धर्म सुरक्षिततेचा भावना देतो. आता हजारो लोक सनातन धर्म स्वीकारतील.
4 / 9
येतायत धमक्या - यती नरसिंहानंद म्हणाले, त्यांना आणि जितेंद्र नारायण (वसीम) यांना बऱ्याच दिवसांपासून धमक्या येत आहेत. पण त्यांना कोणाचीच पर्वा नाही. ते जे काम करत आहेत ते समाज आणि देशाच्या हिताचे आहे. लवकरच आणखी बरेच लोक सनातन धर्म स्वीकारू शकतात.
5 / 9
शुद्धिकरणानंतर होते धर्मांतर - महामंडलेश्वर यती नरसिंहानंद म्हणाले, कुणीही सनातन धर्म स्वीकारू शकतो. वैदिक विधींनुसार, प्रथम शुद्धीकरण केले जाते आणि यानंतर गायत्री मंत्र आणि भगवान शिव-शंकरांच्या पंचाक्षरी मंत्राचे पठण केले जाते.
6 / 9
या विधीसाठी गंगाजल आणि पंचगव्याचा वापर केला जातो. हातात गंगाजल घेऊन धर्माचे पालन करण्याची शपथ दिली जाते. यानंतर, जानवे धारण करून यज्ञात आहुती दिली जाते. तसेच, मांसाहार करू नका आणि कुणालाही दुखवू नका, असा संकल्प करवून घेतला जातो.
7 / 9
वसीम रिझवी आता झाले जितेंद्र नारायण त्यागी - उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सोमवारी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. दासना देवी मंदिराचे महंत आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी महाराज यांनी त्यांना वैदिक पद्धतीने सनातन धर्माची दीक्षा दिली.
8 / 9
कुटुंबातील जे लोक हिंदू धर्म स्वीकारणार नाहीत त्यांचा त्याग करणार - धर्मांतरानंतर वसीम रिझवी यांचे नाव जितेंद्र नारायण सिंह त्यागी, असे झाले आहे. धर्मांतराची औपचारिकता पार पडल्यानंतर वसीम रिझवी यांनी, आपण आजपासून हिंदुत्वासाठीच काम करणार असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या कुटुंबाच्या हिंदू धर्म स्वीकारण्याच्या प्रश्नावर, जे हिंदू धर्म स्वीकारणार नाहीत, त्यांचा मी त्याग करेन, असे रिझवी यांनी म्हटले आहे.
9 / 9
जितेंद्र नारायण त्यागी (वसीम रिझवी) आणि गाझियाबाद जिल्ह्यातील दसना देवी मंदिराचे महंत आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHinduismहिंदुइझमIslamइस्लामHindutvaहिंदुत्वMuslimमुस्लीम