शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुईला घाबरता? झायडसची नवीन लस ZyCoV-D बिना सुई टोचता मिळणार; साईड इफेक्टही छूमंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 2:25 PM

1 / 10
भारतीय कंपनी झायडस कॅडिलाने ZyCoV-D या कोरोना लसीसाठी डीसीजीआय (DCGI) कडे आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. १२ वर्षांवरील मुलांसाठी ही लस बनविण्यात आसली असून या लसीमध्ये खूप काही गोष्टी या खास आहेत. (all about to know Zydus cadila corona vaccine ZyCoV-D )
2 / 10
महत्वाचे म्हणजे ही पहिली पालस्मिड DNA लस आहे. याचसोबत ती बिना सुई वापरता देता येणार आहे. यासाठी फार्माजेट तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यामुळे साईड इफेक्टचा धोकादेखील कमी होणार आहे.
3 / 10
झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देखील पूर्ण झाली आहे. यामध्ये २८००० मुलांनी सहभाग घेतला होता. भारतातील कोणत्याही लसीची सर्वात मोठी चाचणी आहे. याचे परिणामही दिलासा देणारे असल्याचे सांगितले गेले आहे.
4 / 10
दुसऱ्या कोरोना लाटेच्या काळात देशभरातील ५० क्लिनिकल केंद्रांवर याची चाचणी घेण्यात आली होती. ही लस डेल्टा व्हेरिअंटवर देखील परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
5 / 10
झायडसची ही लस १२ ते १८ वयोगटाच्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचे दिसले आहे. फार्माजेट हे तंत्रज्ञान सुई विरहित (PharmaJet needle free applicator) आहे. या द्वारे ही लस दिली जाणार आहे. यामध्ये सुईची गरज पडत नाही.
6 / 10
सुई नसलेल्या इंजेक्शनमध्ये लस भरली जाते. यानंतर हे इंजेक्शन एका मशीनला लावून दंडावर लावले जाते. मशीनचे बटन दाबल्यावर आतील औषध हे शरीरात घुसते.
7 / 10
कंपनी वर्षाला १० ते १२ कोटी डोस बनवू शकते. ZyCoV-D चे एकूण तीन डोस घ्यावे लागणार आहेत. याच तंत्रज्ञानाने हे डोस टोचले जाणार आहेत, असे मानले जात आहे. यामुळे साईड इफेक्ट कमी होऊ शकतो.
8 / 10
ZyCoV-D ची आणखी एक चांगली बाब म्हणजे ही लस साठविण्यासाठी कमी तापमान ठेवण्याची गरज नाही. यामुळे कोल्ड चेनची गरज राहत नाही.
9 / 10
Plasmid आधारित डीएनए लसीमुळे अँटीजन- विशिष्ट इम्युनिटी वाढविण्याचे काम केले जाते. ही लस २ ते ८ डिग्री तापमानात ठेवता येते. ही लस बायो-सेफ्टी लेवल १ लॅबमध्ये बनविली जाते. अन्य लशींसाठी लेव्हल ३ लॅब लागते.
10 / 10
या प्रकारे लस बनविल्याने बी आणि टी सेल दोन्ही अॅक्टिव्ह होतात. यामुळे लस चांगल्या प्रकारे परिणाम देते. तसेच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर करण्यास मदत होते.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या