Aadhaar-PAN Linking Status: तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक झाले का? असे करा काही मिनिटांत चेक...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:59 PM2021-03-31T12:59:09+5:302021-03-31T13:07:56+5:30

Is your Aadhaar-PAN card linked? Check it out in a few minutes ... सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने पर्मनंट अकाऊंट नंबर (PAN) आणि आधार लिंकिंगची शेवटची तारीख 31 मार्च 2021 ठेवली आहे. या आधी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. जर तुम्ही हे केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. तुमचे पॅन-आधार लिंक झाले की नाही हे कसे तपासाल? आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप सांगणार आहोत.

आयकर विभागाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. आज याची शेवटची तारीख आहे. न केल्यास 1 एप्रिल 2021 पासून 1000 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. जरी केलेले असले तरीदेखील ते झालेय का हे तपासणे गरजेचे आहे. (Check if your PAN is linked with your Aadhaar)

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने पर्मनंट अकाऊंट नंबर (PAN) आणि आधार लिंकिंगची शेवटची तारीख 31 मार्च 2021 ठेवली आहे. या आधी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. जर तुम्ही हे केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. (Is your Aadhaar-PAN card linked? Check it out in a few minutes ...)

तुमचे पॅन-आधार लिंक झाले की नाही हे कसे तपासाल? आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप सांगणार आहोत.

यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे तुमचा पॅन नंबर किंवा आधार नंबर असणे गरजेचे आहे.

यानंतर तुम्ही https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी.

आयकर विभागाच्या वेबसाईटवर डाव्या बाजुला क्विक लिंक्समध्ये चार नंबरला Link Aadhaar नावाची लिंक आहे. त्यावर क्लिक करावे लागेल.

यानंतर आधार लिकिंगचे पेज ओपन होईल. तिथे पॅनच्या रकान्यावर क्लिक हिअर अशी लाल रंगात लिंक दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल. ती तुम्ही आधार पॅनला लिंक केले की नाही हे तपासण्याची लिंक आहे.

यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन क्रमांक विचारला जाईल. तो टाकल्यानंतर View Link Aadhar Status वर क्लिक करा.

यानंतर जर तुमचे आधार-पॅन लिंक झाले असेल तर तुम्हाला Your pan is linked to aadhar number XXXXXXXX134” असा हिरव्या रंगातील टिकसोबत मेसेज दिसेल. अशाप्रकारे तुम्ही आरामात तुमचे आधार-पॅनला लिंक झालेय की नाही हे तपासू शकणार आहात.

महत्वाचे म्हणजे आज शेवटचा दिवस असल्याने आयकर विभागाने दिलेल्या लिंकचा सर्व्हर डाऊन असण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला अडचणी येण्य़ाची शक्यता आहे. असे झाल्यास तुम्हाला 1000 रुपयांचा दंड बसण्याची शक्यता आहे.

Read in English