१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:45 IST
1 / 9ऑपरेशन सिंदूरनंतर दीड महिन्याने भारताने मोठ्या हालचाली केल्या आहेत. गेल्या २४ तासांत एकामागोमाग एक अशा तीन वेगवेगळ्या स्वदेशी मिसाईलच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकाच दिवसात तीन मिसाईल डागून भारताने पाकिस्तान, तुर्की आणि चीनला एकाच वेळी मोठा संदेश दिला आहे. 2 / 9१६ आणि १७ जुलै २०२५ रोजी भारताने संरक्षण क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे. आकाश मिसाईलचे नेक्स्ट लेव्हलचे व्हर्जन आकाश प्राईम लडाखमधून डागण्यात आले. भारतीय लष्कर आणि डीआरडीओने लडाखच्या उंच आणि मोहिमांसाठी कठीण प्रदेशात क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 3 / 9या भागात आकाशात खूप संघर्ष करावा लागतो. कारण ही चाचणी ४,५०० मीटरपेक्षा जास्त (सुमारे १५,००० फूट) उंचीवर केली जाते. तिथे ऑक्सिजनची वानवा असते आणि वारेही जोरदार असतात. यामुळे या ठिकाणी मिसाईलला इंधन जाळण्यासाठी ऑक्सिजनसाठी संघर्ष करावा लागतो. तसेच वाऱ्यांमध्ये देखील संघर्ष करावा लागतो. 4 / 9तर पृथ्वी-२ आणि अग्नि-१ या मिसाईलची चाचणी ओडिशामध्ये घेण्यात आली. दोन्हीही कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत जी भारतासाठी अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी सक्षम आहेत. म्हणजेच चीन आणि पाकिस्तान दोन्हीही या मिसाईलच्या कक्षेत असतात. 5 / 9पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना ज्या एअर डिफेन्स सिस्टीमने परतवून लावले, त्यात आकाश मिसाईलचा मोठा भाग होता. त्याचेच अद्ययावत व्हर्जन आकाश प्राईम आहे. जे ३०-३५ किमीच्या परिघात कोणत्याही लक्ष्याचा अचूक भेद करू शकते. 6 / 9यात मग लढाऊ विमान असेल किंवा शत्रूचे क्रूझ मिसाईल किंवा तुर्कीचे घातक ड्रोन्स. सर्वांना भारतीय जमिनीपासून १८-२० किमी उंचीवर उडवू शकते. 7 / 9या मिसाईलमध्ये राजेंद्र रडार बसविण्यात आला आहे. जो ३६० डिग्री कव्हरेज देतो. यामुळे एकाचवेळी अनेक लक्ष्य ट्रॅक करता येतात. 8 / 9पृथ्वी-२ हे मिसाईल मध्यम पल्ल्याचे असून ते ३५० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. हे द्रव इंधनावर चालणारे मिसाईल आहे. 9 / 9तर अग्नि-१ ची रेंज ही ७०० किलोमीटर आहे. हे मिसाईल घन इंधनावर चालते.