नॅशनल फ्राईड राईस डे; भातप्रेमींसाठी खास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 07:00 AM2020-09-20T07:00:00+5:302020-09-20T07:00:06+5:30

ज्यांना भात अतिशय आवडतो त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय स्पेशल आहे. कारण आज आहे, फ्राईड राईस डे.. पाश्चात्य व चीनमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

जगात पहिल्यांदा फ्राईड राईस हा चीनमध्ये बनवला गेला असे उल्लेख आहेत. उरलेल्या भाज्या वापरून तो केला गेला होता. ज्या काळात चीनची स्थिती आजच्या स्थितीपेक्षा विपरित होती. जगातला सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश, गरीबीत जगणारा देश असे त्याचे वर्णन होते. त्याच काळात या फ्राईड राईसचा जन्म झाला.

ग्रेट चायना वॉलच्या बांधणीत तांदळाचा वापर करण्यात आला होता. पातेल्याच्या बुडाशी चिकटलेला भात खरवडणे किती अवघड असते याचा अनुभव कधीतरी तुम्ही घेतला असेल. शाळेत असताना पतंग चिकटवण्यापासूनची कामे भाताच्या शितांनी केली जायची. भातामधला हा गुण ओळखून पंधराव्या शतकात बांधलेल्या या भिंतीत त्याकाळच्या कारागिरांनी एका विशिष्ट तांदळाच्या भाताचा वापर केल्याचे उल्लेख सापडतात.

जगातला सर्वात महाग तांदूळ जपानने तयार केला आहे. किनोमाई प्रिमियम नावाच्या या एक किलो तांदळासाठी तब्बल १० हजार रुपये मोजावे लागतात. यात पाच प्रकारचे तांदूळ एकत्र केले जातात.

जगात फ्राईड राईस कितीही आवडीने खाल्ला जात असला तरी चीनमध्ये मात्र फ्राईड राईस हा रोजच्या खाण्यातला पदार्थ नाही. त्यांच्या जेवणात साधा भात हा अधिक खाल्ला जातो.

जगातल्या बहुतेक देशांमध्ये फ्राईड राईस खाल्ला जातो. प्रत्येक ठिकाणची बनवण्याची पद्धत वेगळी आहे.

टॅग्स :अन्नfood