शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे कधी वाढविणार? भाजपा नेत्याने तारीखच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 09:23 IST

1 / 9
लाडकी बहीण योजनेतील मानधनात १५०० रुपयांवरून २१०० रुपये इतकी वाढ पुढील वर्षी दिवाळीपासून केली जाईल असे स्पष्ट संकेत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.
2 / 9
मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि जाहीरनाम्यात आम्ही मानधन वाढीचे आश्वासन दिले होते.
3 / 9
ते आश्वासन आम्ही पूर्ण करू. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.
4 / 9
आपण शब्दावर ठाम राहायला हवे. मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करणार आहोत.
5 / 9
आमच्या महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणांना २१०० रुपये देण्याची क्षमता आहे. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून वाढ करायची याबाबत चर्चा करण्यात येईल.
6 / 9
आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.
7 / 9
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या बहुतांशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
8 / 9
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला व दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला.
9 / 9
नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत.
टॅग्स :BJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMahayutiमहायुती