शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याचा निर्णय कधी होणार? अखेर उत्तर मिळालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 01:13 IST

1 / 7
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिची अंमलबजावणीही केली. निवडणुकीच्या आधीच महिलांना याचा लाभ देण्यात आला.
2 / 7
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. १५०० रुपये महिलांना दिले जातात, ते २१०० रुपयांवर वाढवणार असे आश्वासन दिले गेले. विधानसभा निवडणूक झाली. सरकार स्थापन झाले. एक अधिवेशनही झाले. मात्र, याबद्दलचा निर्णय अद्याप झाला नाही.
3 / 7
विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हफ्ता २१०० रुपये येईल, अशी आशा लाभार्थी महिलांना होती, १५०० रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे २१०० रुपये करण्याचा निर्णय कधी होणार याची सगळ्यांना प्रतिक्षा आहे.
4 / 7
२१०० रुपये करण्याचा निर्णय कधी होणार, याबद्दल महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरेंनी सविस्तर माहिती दिली.
5 / 7
अदिती तटकरे म्हणाल्या, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नवीन अर्थसंकल्प... आपण ज्यावेळी रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो, त्या वर्षाच्या कुठल्याही कालावधीत होत नसतात. आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली, त्यावेळी सुद्धा ती योजना अर्थसंकल्पात आणली होती आणि तिथून ती सुरू झाली होती. त्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी येईल, ज्यावेळी अर्थसंकल्प तयार केला जाईल. त्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय त्यावेळी निश्चितपणे घेतला जाईल.'
6 / 7
म्हणजेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत जे हफ्ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळतील, ते १५०० रुपयेच असेल.
7 / 7
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचे मानधन १५०० रुपयांवरून २१०० करण्याची तरतूद केली जाईल. त्यासाठी वाढीव निधीची तरतूद केली जाईल आणि नंतर याची अंमलबजावणी होईल. म्हणजे ३ मार्च २०२५ पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयेच मिळणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीAditi Tatkareअदिती तटकरे