शरद पवारांच्या पक्षाचा आमदार अजित पवारांना भेटला; कोणती मागणी केली? स्वत:च केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:49 IST
1 / 6विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मतदारसंघातील कामांच्या निमित्ताने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विविध आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटत असल्याचं दिसत आहेत.2 / 6अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर आता बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.3 / 6'बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले,' अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली. 4 / 6'दादांसारखा प्रशासनावर पकड असणारा नेता पालकमंत्री झाल्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल यात शंका नाही,' असा विश्वासही संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.5 / 6शरद पवारांच्या पक्षाच्या आमदाराने अजित पवारांची भेट घेतल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. त्यावर स्पष्टीकरण देत आपण ही भेट कशासाठी घेतली, याबाबतचा खुलासा क्षीरसागर यांनी केला आहे.6 / 6'मी बीड MIDC बाबत दादांशी चर्चा केली. MIDC चा विकास व्हावा जेणेकरून बीड शहरात अधिकाधिक उद्योग यावेत व त्यातून रोजगार निर्मिती होऊन जिल्हा विकासाचा वाटेवर यावा याबाबत दादांकडे काही मागण्या केल्या. दादांनी देखील सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली आहे,' अशी माहिती संदीप क्षीरसागरांनी दिली आहे.