Jay Ajit Pawar Photo Viral with Bollywood Actress: अजित पवारांच्या मुलाचा बॉलिवूड अभिनेत्री सोबत फोटो झाला व्हायरल; फोटोमुळे चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 21:57 IST
1 / 9Jay Ajit Pawar Photo Viral with Bollywood Actress: महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाला खूप महत्त्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ही दोन नावं कायमच चर्चेत असतात. पण सध्या अजित पवार यांचा मुलगा जय पवार (Jay Pawar) हे नाव देखील चर्चेत आहे. (फोटो सौजन्य - फेसबुक)2 / 9अजित पवार यांना पार्थ आणि जय ही दोन मुलं आहेत. त्यापैकी जय पवार यांचा एक फोटो सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतो आहे. जय पवार यांचा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress) सोबतचा फोटो सध्या व्हायरल होतोय. (फोटो सौजन्य - फेसबुक)3 / 9जय पवार, त्यांचा एक मित्र आणि ती बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री असा तिघांचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्या अभिनेत्रीबाबत सध्या बरीच चर्चा रंगली आहे, त्या अभिनेत्रीबाबत जाणून घेऊया.4 / 9जय पवार यांचा बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल झालाय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. उर्वशीसोबतच्या जय यांच्या एका फोटोने सध्या सोशल मीडियात चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय.5 / 9उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या प्रसिद्ध अशा बुर्ज-अल-अरबमधला असल्याचा दावा काहींनी केला आहे. त्यामुळे या फोटोची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.6 / 9उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वीही चर्चेत आली होती. भारताचा विकेटकिपर रिषभ पंत (Indian cricketer Rishabh Pant) यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. २०१९ मध्ये या दोघांना एकत्र पाहिल्याचं वृत्त व्हायरल झालं होतं.7 / 9रिषभ पंत आणि उर्वशी हे दोघेच एका ठिकाणी एकत्र असल्याचा फोटो दिसला होता. त्यामुळे त्यांच्यात नक्की काय आहे, याची चर्चा रंगली होती. त्यांच्या प्रेमाच्या चर्चांचं बी-टाऊनमध्ये गॉसिप झालं होतं, तसंच उर्वशीला भेटण्यासाठी रिषभने १६-१७ तास वाट बघितली होती, असंही बोललं गेलं होतं.8 / 9उर्वशी रौतेला ही प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अनेक कार्य़क्रमांना हजेरी लावताना दिसली आहे. उर्वशी ही विविध कारणांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. यावेळी जय पवार यांच्यासोबतच्या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.9 / 9सध्या जय पवार यांच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोत मात्र उर्वशी रौतेला एकटी नसून जय यांचा एक मित्रदेखील मध्ये फोटोसाठी पोझ करून उभा असल्याचं दिसतंय. मात्र असं असलं तरी सोशल मीडियावर फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.