शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नराधमांनी मृत शरीरावर पाय ठेवला, नंतर हसत सेल्फी; संतोष देशमुखांचे फोटो समोर येताच महाराष्ट्र सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 00:19 IST

1 / 14
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने पूर्ण होत आले असताना नराधम आरोपींनी गाठलेली क्रौर्याची परिसीमा दाखवणारे फोटो समोर आले आहेत.
2 / 14
संतोष देशमुख यांचा विकृत वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे खून केल्याचं सीआयडीच्या तपासात स्पष्ट झालं आहे.
3 / 14
विविध पुराव्यांच्या आधारे नुकतेच सीआयडीने वाल्मीक कराडसह अन्य आरोपींविरोधातचे आरोपपत्र कोर्टात सादर केले.
4 / 14
आरोपपत्र सादर झाल्यानंतर आता संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या बेदम मारहाणीचे आणि आरोपींची विकृत मानसिकता दर्शवणारे फोटो समोर आले असून सदर फोटो बघून समाजमन सुन्न झालं आहे.
5 / 14
संतोष देशमुख यांना विविध हत्यारांनी मारहाण करून आरोपी हा खून एन्जॉय करत असल्याचं फोटोंमधून दिसत आहे.
6 / 14
एक आरोपी संतोष देशमुख यांच्या मृतदेहासोबत फोटो काढत हसताना आढळून आला आहे.
7 / 14
एका नराधमाने संतोष देशमुख यांच्या मृत शरीरावर पाय ठेवून फोटो काढला आहे.
8 / 14
वाल्मीक कराड म्होरक्या असलेल्या या टोळीने पाइपला करदोड्याने मूठ तयार करून मारहाण केली. तसेच, एका लोखंडी पाइपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली. या पुराव्यांसह सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे जप्त केले आहेत
9 / 14
सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी अपहरण करून हत्या झाली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.
10 / 14
मारहाण, खंडणी आणि हत्या या तिन्ही प्रकरणांचे एक हजार पानांचे दोषारोपपत्र सीआयडीने न्यायालयात दाखल केले. याचे अवलोकन केल्यानंतर अंगावर शहारे आणणारे कृत्य या टोळीने केल्याचे दिसते.
11 / 14
मारहाण करताना आरोपींनी देशमुख यांचे कपडे काढून मारहाण केली. हे करताना आरोपी मोठमोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद साजरा करत असल्याचा दावा सीआयडीने आरोपपत्रात केला. आरोपींनी याचा शेअर केलेला व्हिडीओदेखील सीआयडीच्या हाती लागला आहे.
12 / 14
एक गॅसचा पाइप ज्याची लांबी ४१ इंच आहे. एक बाजू गोलाकार केलेली व त्यावर काळ्या करदोड्याने गुंडाळून मूठ तयार केली. याच पाइपवर लालसर रक्ताचा डाग आढळला.
13 / 14
एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मूठ असलेला पाइप त्यात लोखंडी तारेचे ५ क्लच वायर बसवले. त्यात लोखंडी मुठीची लांबी ५.५ इंच आहे. त्यास बसवलेल्या क्लच वायरची मुठीसह लांबी ४१.५ इंच आहे.
14 / 14
‘सरपंच, तुला जिवंत सोडणार नाही’- ६ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीकला खंडणी दिली नाही म्हणून सुदर्शन घुलेसह इतर मस्साजोगला गेले. तेथे कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी वाद घालत असतानाच सरपंच संतोष देशमुख तेथे आले. त्यांनी असे करू नका, अशी विनंती करत अडवले. यावर घुले याने ‘सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली होती.
टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारी