Sanjay Raut Arrested : संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड ते अटक असा होता घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 09:33 IST
1 / 11पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापा टाकला. 2 / 11ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली.3 / 11रविवारी सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी सीआयएसएफसोबत राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी त्यांनी चौकशी आणि झाडाझडतीला सुरूवात केली. जवळपास ९ तास ईडीची टीम तिकडे होती.4 / 11जेव्हा शिवसैनिकांना याची माहिती मिळाली तेव्हा हळूहळू त्यांनी राऊत यांच्या घराबाहेर जमण्यास सुरूवात केली. प्रकरण इतकं वाढलं की शेजाऱ्यांना पोलिसांना बोलवावं लागलं.5 / 11छाप्यांदरम्यान राऊत यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीटही करण्यात आले. आपण शिवसेना सोडणार नाही. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहोत आणि झुकणार नाही, असंही ते म्हणाले.6 / 11ईडीची कारवाई सुरू असतानाच तब्बल सहा तासांनंतर संजय राऊत हे घराच्या खिडकीकडे आले. त्या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या समर्थकांना हात दाखवला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधूही उपस्थित होते.7 / 11ईडीच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी संजय राऊत यांच्या आईनं त्यांना ओवाळलं. तसंच त्यांनी आपल्या आईच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या गाडीतून ईडी कार्यालयाकडे निघून गेले.8 / 11घरातून ईडी कार्यालयाकडे जाताना आपल्या गाडीच्या रुफ टॉपमधून ते बाहेर आले. तसंच त्यांनी आपल्या गमछा हवेत फडकावला.9 / 11ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतरही त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट झालं. तुम्ही त्या व्यक्तीला कधी हरवू शकत नाही, जो पराभव मानत नाही, झुकणार नाही, जय महराष्ट्र असं ट्वीट करण्यात आलं होतं.10 / 11कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.11 / 11अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना रात्री १२ वाजता ईडीनं अटक केली.