धावत्या वाहनांना लागतेय आग; तुम्ही काय खबरदारी घ्याल ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 18:26 IST
1 / 6वाहनातील बिघाडाचे संकेत : केबिनमध्ये जळल्यासारखा वास येणे, धूर निघताना दिसणे, डॅशबोर्डवरील 'इंजिन चेक' किंवा 'टेंपरेचर' लाइट लागणे, पिकअप सोडणे हे संकेत आहेत.2 / 6सिस्टीम लॉक झाल्यास काय कराल ? : आग लागल्यास अनेकदा सेंट्रल लॉकिंग सिस्टीम जॅम होते आणि दरवाजे उघडत नाहीत. यावेळी घाबरून न जाता सीटबेल्ट कटर किंवा जड वस्तूने खिडकीची काच फोडा, काच फोडताना कोपन्यावर जोरात प्रहार करा, मध्यभागी नाही, गाडीत नेहमी 'लाइफ हॅमर' किंवा अग्निशमन यंत्र ठेवायला हवे.3 / 6काय काळजी घ्याल ? : गाडीचे सर्व्हिसिंग वेळेवर करा आणि फक्त अधिकृत शोरुममध्येच वायर चेक करा, उन्हाळ्यात सलग २-३ तास गाडी चालवल्यानंतर १५ मिनिटे ब्रेक द्या, गाडीत कधीही ज्वलनशील पदार्थ (पेट्रोल कॅन, लायटर, परफ्यूम स्प्रे) ठेवू नका, टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवा, घर्षणामुळेही उष्णता वाढते.4 / 6इमर्जन्सीत मदत कुठे मागाल ? : अग्निशमन दल - १०१, पोलिस - १००/११२, रुग्णवाहिका - १०८ , हायवे हेल्पलाइन - १०३३5 / 6ईव्ही व गॅसवरील वाहनांना जास्त धोका : ईव्ही वाहनातील लिथियम बॅटरी तापल्यास 'केमिकल फायर' लागते, जी विझवणे कठीण असते. बॅटरीला इजा झाल्यास तातडीने तपासणी करायला हवी. 'सीएनजी' किंवा 'एलपीजी' वाहनातील गॅस किटचे हायड्रो-टेस्टिंग वेळेवर करायला हवे.6 / 6वाहनांना आग लागण्याची प्रमुख कारणे - शॉर्टसर्किट : अनधिकृत वायरिंग किंवा निकृष्ट दर्जाच्या अॅक्सेसरीज बसवणे, इंधन गळतीः इंधन पाइपला तडे जाणे किंवा गळती होणे, ओव्हरहिटिंग : कुलंटची पातळी कमी होणे किंवा फॅन बंद पडणे, बॅटरी बिघाड : बॅटरीच्या टर्मिनल्समध्ये घर्षण होऊन ठिणगी पडणे, रेंट बाइट (उंदरांनी वायर कुरतडणे) : यामुळे वायर्स उघड्या पडतात आणि स्पर्श होताच आग लागते.