Pooja Chavan Suicide case : आत्महत्येआधी पूजा चव्हाणनं पोस्ट केले होते हे फोटो; बोलक्या फोटोंमधून नक्की काय सांगायचं होतं?
By manali.bagul | Updated: February 14, 2021 12:30 IST
1 / 9बीड जिल्ह्यातील परळीमधील पूजा चव्हाण (Pooja Chavan) या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (दि. ७) इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या (Suicide case) यावरुन समाज माध्यमांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा चालू आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील राजकरण ढवळून निघाले आहे. 2 / 9 तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन पूजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपाने व्यक्त केला आहे.3 / 9या तरूणीनं आत्महत्येच्याआधी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. तिनं शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या इन्स्टाग्रावर 6 दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आलेला फोटो आहे. शनिवारी तिने हा फोटो पोस्ट केला आहे.4 / 9#khamoshiyan #unforgettablemoments हा हॅशटॅग वापरून पूजाने पांढऱ्या मास्कमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. तिला काहीतरी चांगायचं आहे असं या फोटोतून दिसून येतं.5 / 9#khamoshiyan #unforgettablemoments हा हॅशटॅग वापरून पूजाने पांढऱ्या मास्कमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. तिला काहीतरी चांगायचं आहे असं या फोटोतून दिसून येतं.6 / 9पूजाने त्याआधी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेली असतानाचे देखील काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने, 'काश कभी तो कुछ वैसा हो, जो मैंने सोचा वैसा हो !!' असं कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट 31 जानेवारीची आहे.7 / 9तिच्या सगळ्यात पोस्टवर फॉलोअर्सनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला होता. पूजा या जगात नाही यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. 8 / 9तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. 9 / 9पुजाच्या आधीच्या सगळ्या पोस्ट या आनंदी होत्या. त्यामुळे असं काय झालं म्हणून पूजा आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली असा प्रश्न अनेकांना पडत आहे.