शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol Diesel Prices: "सगळे कपडे काढून घ्यायचे नि लंगोट द्यायचा अशी ही पेट्रोल दर कपात"; शिंदे-फडणवीस सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 4:04 PM

1 / 6
Petrol Diesel Prices in Maharashtra: राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या ( CM Eknath Shinde ) नेतृत्वाखालील सरकारने जनतेला मोठी भेट दिली. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंधनाचे दर काही अंशी कमी करण्याचा निर्णय झाला.
2 / 6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. ही दर कपात राज्यात लगेच मध्यरात्रीपासून लागूदेखील झाली.
3 / 6
परंतु, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं. हा निर्णय म्हणजे एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायचा असे ते म्हणाले.
4 / 6
'भाजपचे केंद्रातील सरकारपेक्षा राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले. कारण एकीकडे राज्य सरकारने सर्व वस्तूंवरील जीएसटी ५ टक्क्यांनी वाढविला, वीज बिल वाढवलं, एलपीजी ५० तर सीएनजी ४ रुपयांनी महाग केलं आणि दुसरीकडे केवळ ५ रुपयांनी पेट्रोल आणि ३ रुपयांनी डीझेल कमी केले.'
5 / 6
'शिंदे-फडणवीस सरकार खूप हुशार आहे ते यावरूनच समजतं. एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायचा अशी पेट्रोल व डिझेलची दरकपात आहे', अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
6 / 6
'नगराध्यक्षपद व सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राज्यातील मुख्यमंत्री हे तर शिवसेना फुटीर गटातून मुख्यमंत्री झाले आहेत ही मोठी गंमत आहे', अशी मिश्कील टिपणीदेखील त्यांनी केली.
टॅग्स :Petrolपेट्रोलChagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेDieselडिझेल