शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:28 PM

1 / 9
राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया.
2 / 9
नुकसानीची तीव्रता पाहून सरकारकडून कृषी विभाग आणि महसूल विभागाला पीक पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले जातात.
3 / 9
पेरणीनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मदतीसाठी आवश्यक असते पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवणे, पिकनिहाय विमा कंपनीकडून मदतीची रक्कम ही ठरवून दिली जाते.
4 / 9
नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सर्वप्रथम गावचा कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवकास याची माहिती देणे गरजेचे असते. त्यानंतर संबंधित दोन्ही विभागाचे अधिकारी बांधावर येऊन पिकांची पाहणी करतात.
5 / 9
नुकसानग्रस्त भागाची पाहणी होत असताना शेतकऱ्यांजवळ सातबारा उतारा, आधार कार्ड, विमा भरलेली पावती आणि क्रमांक, रेशनकार्डची झेरॉक्स, बॅंक पासबुकची झेरॉक्स, असणे गरजेचे आहे.
6 / 9
पेरणी क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्याची तीव्रता काय आहे? या संबंधिचा अहवाल हा कृषी कार्यालय आणि महसूल विभागाला दिला जातो.
7 / 9
महसूल विभागाकडून नुकसानीचा अहवाल हा विमा कंपनीकडे पाठवला जातो. शासकीय अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनीधी हे मदतीची रुपरेषा ठरवतात.
8 / 9
पेरणी क्षेत्रापैकी २५ टक्के पेक्षा अधिकच्या क्षेत्रावरील नुकसान झाले असल्यासच ही भरपाई मिळते.
9 / 9
नुकसानीच्या अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्यांनी दिलेल्या बॅंक पासबूकच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा केली जाते.
टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाMumbaiमुंबईRainपाऊस