शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यंदा 'रमजान' महिन्यात 'नो मस्जीद नमाज, No इफ्तार'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 6:37 PM

1 / 9
पुढील काही दिवसांत पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे, त्यासाठी मुस्लीम बांधवांनी लॉकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक आहे.
2 / 9
देशात व राज्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, मुस्लीम बांधवांना रमजान महिन्यातही काटेकोरपणे सरकारी नियमांचे पालन करावेच लागले.
3 / 9
रमजान महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असतो, यावेळी नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम दरवर्षी एकत्र येतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही.
4 / 9
राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीमध्ये मुस्लीम एकत्र येऊ नमाज पठण करत असल्याचे दिसून आले, त्यावर पोलिसांनी कारवाईही केली आहे.
5 / 9
या सर्व प्रकरणाची दखल घेत, अल्पसंख्याक विकास विभागाने रमजान महिन्यासाठी आवाहन केलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.
6 / 9
कोणत्याही परिस्थितीत घराच्या छतावर, मैदानावर, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण करु नये
7 / 9
कोणताही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी
8 / 9
सर्व मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण करावे, तरावीह इफ्तार पार्टी आणि धार्मिक कार्य पार पाडावे
9 / 9
लॉकडाऊन संदर्भात पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत, उपरोक्त सूचनांचे पालन करावे.
टॅग्स :nawab malikनवाब मलिकMuslimमुस्लीमcorona virusकोरोना वायरस बातम्या