1 / 7लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा फायदाही झाला. पण, निवडणुकीच्या तोंडावर लाभ देताना सरकारने पडताळणी न करताच पैसे दिले. यात पात्र नसणाऱ्या महिलांनाही संधी साधत पैसे घेतले. पण, त्यांना आता पैसे परत देण्याची वेळ येणार आहे.2 / 7होय. लाडकी बहीण योजनेचा सरकारी आणि जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांनीही लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी योजनेसंदर्भात विधानसभेत लेखी उत्तर दिले.3 / 7अदिती तटकरे म्हणाल्या की, '२,२८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे १५०० अर्थसहाय्य थांबवण्यात आले आहे. या प्रकारामुळे सरकारला थेट ३ कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.'4 / 7'या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषी आढळलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल', असे अदिती तटकरेंनी लेखी उत्तरात सांगितले. 5 / 7'लाभ घेण्याची अट मोडणाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाईल', असे त्यांनी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले.6 / 7गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे योजनेसाठी लागणारा प्रचंड निधी. त्यासाठी इतर विभागाचाही निधी वळवण्यात आला. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती.7 / 7विधानसभा निवडणुकीआधी अर्ज करणाऱ्या महिलांना सरकारकडून पडताळणी केल्याविना लाभ दिला गेला. पण, योजनेवर होत असलेल्या खर्चामुळे आता पडताळणी हात घेण्यात आली आहे. उत्पन्न जास्त असणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याविरोधात सरकार काय कार्यवाही करणार, याचीही चर्चा सुरू आहे.